आत्महत्त्या केलेल्या शेतकरी कुटुंबीयांचे सांत्वन
By Admin | Updated: November 27, 2015 23:52 IST2015-11-27T23:52:30+5:302015-11-27T23:52:57+5:30
आत्महत्त्या केलेल्या शेतकरी कुटुंबीयांचे सांत्वन

आत्महत्त्या केलेल्या शेतकरी कुटुंबीयांचे सांत्वन
डांगसौदाणे : बुंधाटे (ता. बागलाण) येथील आत्महत्त्या केलेल्या कर्जबाजारी शेतकऱ्याच्या कुटुंबाला बुधवारी बागलाणचे तहसीलदार अश्विनीकुमार पोतदार यांनी भेट देऊन या कुटुंबीयांचे सांत्वन करीत शासनाकडून मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले.
सोमवारी बुंधाटे येथील शेतकरी रामदास काशीनाथ देवरे यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून द्विधा मन:स्थितीतून शेतातील घरात गळफास घेऊन आत्महत्त्या केली. त्यामुळे बुंधाटेसह परिसरातून घटनेबाबत हळहळ व्यक्त होत आहे. मृत शेतकरी देवरे यांच्या कुटुंबाला या घटनेने मोठा धक्का बसला
आहे.
बुधवारी दुपारी बागलाणचे तहसीलदार पोतदार यांनी या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना मानसिक आधार देत विचारपूस केली. तसेच घडलेल्या घटनेची तत्काळ चौकशी करून कुटुंबाला त्वरित मदत मिळवून देण्याचे आश्वासन तहसीलदार पोतदार यांनी दिले. यावेळी त्यांच्यासमवेत कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी, तलाठी एस. जे. सोनवणे, सर्कल अधिकारी जाधव, राजू सोनवणे आदि उपस्थित होते. (वार्ताहर)