गटबाजी सोडून एकत्र यावे
By Admin | Updated: July 30, 2016 23:20 IST2016-07-30T23:15:27+5:302016-07-30T23:20:11+5:30
सटाणा : भाजपाच्या तालुकास्तरीय मेळाव्यात पदाधिकाऱ्यांचे आवाहन

गटबाजी सोडून एकत्र यावे
सटाणा : आगामी नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायती समिती या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या होऊ घातलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष सुनील बागुल, जिल्हाध्यक्ष दादा जाधव यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली शहर व तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
मेळाव्यात अनेक पदाधिकाऱ्यांनी भाषणात केंद्र आणि राज्यातील सत्तेचा उपयोग करून शहर व तालुक्याच्या विकासासाठी स्थानिक स्वराज्य संस्था काबीज करणे आवश्यक असल्याचे सांगून गट-तटाला मूठमाती देऊन एकत्र यावे, असे आवाहन केले. ही भाषणबाजी सुरू असताना कौतिकपाडे येथील भाजपाचे पदाधिकारी व सटाणा बाजार समितीवर संचालक म्हणून नुकतेच नियुक्त झालेले जिभाऊ मोरकर यांनी निवडणुका आम्ही जिंकायच्या कशा असा सवाल उपस्थित केल्याने सर्वत्र शांतता पसरली. जिल्हाध्यक्ष दादा जाधव, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. विलास बच्छाव, सरचिणीस बापूसाहेब पाटील, नंदू खैरनार, चिटणीस गजेंद्र चव्हाण, तालुकाध्यक्ष संजय भामरे, साहेबराव सोनवणे यांनीही मनोगत व्यक्त केले. मेळाव्यास शहराध्यक्ष मुन्ना सोनवणे, व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष बिंदूशेठ शर्मा, नगरसेवक उज्ज्वला सोनवणे, अण्णा अहिरे, प्रकाश सांगळे, प्रकाश कुमावत, मंगेश पवार, अतुल पवार, साहेबराव जे. सोनवणे, मंगेश खैरनार, महेंद्र पवार, दिलीप सोनवणे, देवेंद्र जाधव, प्रशांत कोठावदे जगदीश मुंडावरे, दिलीप येवला, पवन सांगळे, सईड मुल्ला, परेश पाठक, प्रकाश कुमावत, श्याम लोखंडे, महिला आघाडीचे तालुकाध्यक्ष पुष्पलता पाटील, सरोज चंद्रात्रे, कल्पना पवार मंगला मेणे, सविता अिहरे, श्रद्धा जाधव, ज्योती खैरनार, भारती पवार उपस्थित होते. (वार्ताहर)