‘चला पक्षी मोजू या’ उपक्रम उद्या

By Admin | Updated: January 24, 2015 00:16 IST2015-01-24T00:16:41+5:302015-01-24T00:16:55+5:30

‘चला पक्षी मोजू या’ उपक्रम उद्या

'Come bird mugs or' ventures tomorrow | ‘चला पक्षी मोजू या’ उपक्रम उद्या

‘चला पक्षी मोजू या’ उपक्रम उद्या

नाशिक : नेचर क्लब आॅफ नाशिकच्या वतीने रविवारी (दि. २५) सकाळी ८ वाजता ‘चला पक्षी मोजू या’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. संत गाडगे महाराज धर्मशाळेपासून या उपक्रमाला प्रारंभ होणार आहे.
नागरिकांना पक्ष्यांची ओळख व्हावी, पक्ष्यांची नेमकी संख्या कळावी, पक्ष्यांच्या कमी झालेल्या जाती, सीमेंटच्या जंगलात घरट्यांवर होणारे परिणाम यांची माहिती व्हावी, या उद्देशाने हा पक्षिगणनेचा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. मोहिमेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या पक्षिमित्रांनी पाण्याची बाटली व वाहनासह संत गाडगे महाराज धर्मशाळा येथे उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष प्रा. आनंद बोरा यांनी केले आहे.

Web Title: 'Come bird mugs or' ventures tomorrow