पंचवटी: सियावर रामचंद्र की जय, धर्म की जय हो, अधर्म का नाश हो असा जयघोष करत विजयादशमी (दसरा) निमित्ताने चतु:संप्रदाय आखाड्याच्या वतीने विजयाचे प्रतीक म्हणून गुरु वारी (दि.१८) रावणाचा ४० फूट उंचीचा पुतळा दहन करण्यात आला.रामकुंड येथील श्री व्यंकटेश बालाजी मंदिरात चतु:संप्रदाय आखाड्याच्या वतीने गेल्या दहा दिवसांपासून आयोजित करण्यात आलेल्या भगवान बालाजीचा नवरात्र उत्सव संपन्न झाला. सायंकाळी ७ वाजता प्रभू श्रीराम, लक्ष्मण, हनुमान, वानरसेना यांची गंगाघाट परिसरातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.प्रभू रामाच्या भूमिकेत कौशल घोडके, भाग्येश देशपांडे (लक्ष्मण), विवेकानंद घोडके (हनुमान), छोटूराम आढळकर (रावण), आदित्य शिंदे, (विभिषण), (कुंभकर्ण) यश कोठावदे आदींनी भूमिका साकारल्या. कार्यक्र माला आमदार बाळासाहेब सानप, पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल, विनिता सिंगल, सहायक पोलीस आयुक्त शांताराम पाटील, महंत कृष्णचरणदास, महंत भक्तिचरणदास, महंत राजारामदास, रामनारायण महाराज, पंचवटीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, पोलीस निरीक्षक विजय ढमाळ, पांडुरंग बोडके, सचिन डोंगरे, देवांग जानी, किशोर गरड, भाविक उपस्थित होते.सियावर रामचंद्र की जयरामकुंडावर सवाद्य मिरवणुकीने आगमन झाल्यानंतर वानरसेना व राक्षससेना यांच्यात झालेल्या युद्धात राक्षसांचा वध करण्यात येऊन विजयाचे प्रतीक म्हणून रावणाच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. यावेळी उपस्थित भाविकांनी सियावर रामचंद्र की जय अशी घोषणा दिली.
४० फुटी रावणाचे गंगाघाटावर दहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2018 00:35 IST
सियावर रामचंद्र की जय, धर्म की जय हो, अधर्म का नाश हो असा जयघोष करत विजयादशमी (दसरा) निमित्ताने चतु:संप्रदाय आखाड्याच्या वतीने विजयाचे प्रतीक म्हणून गुरु वारी (दि.१८) रावणाचा ४० फूट उंचीचा पुतळा दहन करण्यात आला.
४० फुटी रावणाचे गंगाघाटावर दहन
ठळक मुद्देविजयादशमी : श्रीरामाची सवाद्य मिरवणूक