दिमाखदार सोहळ्यात रंगकर्मींचा सन्मान

By Admin | Updated: June 12, 2015 00:16 IST2015-06-12T00:07:48+5:302015-06-12T00:16:03+5:30

राज्य नाट्य स्पर्धा : नाशिक, नगर व जळगावमधील गुणवंतांना पारितोषिके प्रदान

Colorful honors in the celebratory ceremony | दिमाखदार सोहळ्यात रंगकर्मींचा सन्मान

दिमाखदार सोहळ्यात रंगकर्मींचा सन्मान

नाशिक : सांस्कृतिक संचालनालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या ५४ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा व बाराव्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीतील पारितोषिक विजेत्यांचा आज दिमाखदार सोहळ्यात सन्मान करण्यात आला. यावेळी सादर करण्यात आलेल्या ध्वनिचित्रफितीमुळे नाट्य क्षेत्राचा वैभवशाली इतिहासही उलगडला.
महाकवी कालिदास कलामंदिरात हा कार्यक्रम रंगला. नाशिक, अहमदनगर व जळगाव जिल्ह्यातील विजेत्यांना नेताजी भोईर, जयप्रकाश जातेगावकर, अरुण रहाणे, प्रकाश साळवे, नारायण देशपांडे, बाबा चिटणीस, सुनील ढगे, महेंद्र खेडेकर, राजेंद्र जाधव, निशा काथवटे, सुरेश गायधनी, रामनाथ माळोदे, रवि रहाणे, राजू पत्की, गिरीश जुन्नरे, आनंद ढाकीफळे, मीना वाघ, डॉ. राजेश अहेर, प्रदीप पाटील, राजेंद्र तिडके यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली. सांस्कृतिक संचालनालयाचे सहसंचालक मनोज सानप यांनी मान्यवरांचे स्वागत केले. स्वानंद बेदरकर व सुनेत्रा महाजन यांनी सूत्रसंचालन केले.
विजेते असे : नाट्यनिर्मिती प्रथम : न हि वैरेन वैराणि (लोकहितवादी मंडळ, नाशिक), स्मशानयोगी (वात्सल्य प्रतिष्ठान, नगर), अपूर्णांक (ऊर्जा फाउंडेशन, जळगाव). बालनाट्य प्रथम - सांबरी (रावसाहेब विद्यालय, जळगाव), नाट्यनिर्मिती द्वितीय : बालनाट्य - म्या बी शंकर हाय (नाशिक), हौशी नाट्य - छू मंतर (धुळे), शिकस्त (जळगाव), उदकशांत (नगर), नाट्यनिर्मिती तृतीय : वा गुरू (नाशिक), वद जाऊ कुणाला शरण (भुसावळ), मन वैशाखी डोळे श्रावण (नगर).
उत्कृष्ट अभिनय (रौप्यपदके) : बालनाट्य- अजिंक्य साळुंखे, कृष्णा चव्हाण (जळगाव), हौशी नाट्य : हेमंत देशपांडे, श्रुती जोशी (नाशिक), विशाल जाधव, मंजूषा भिडे (जळगाव), राजेंद्र क्षीरसागर, रेखा निर्मल (नगर).
दिग्दर्शन (प्रथम) : बालनाट्य - प्रतिमा याज्ञिक (जळगाव), हौशी नाट्य : मुकुंद कुलकर्णी (नाशिक), अमरसिंग राजपूत (जळगाव), सतीश लोटके (नगर), द्वितीय : बालनाट्य - सागर रत्नपारखी (नाशिक), हौशी नाट्य : मुकेश काळे (धुळे), सचिन चौघुले (जळगाव), राजेंद्र क्षीरसागर (नगर).
नेपथ्य (प्रथम) : बालनाट्य - कीर्तीकुमार शेलकर (जळगाव), हौशी नाट्य - राहुल मनोहर (नाशिक), राज गुंगे (जळगाव), अमोल खोले (नगर).
नेपथ्य (द्वितीय) : बालनाट्य - अमोल खोले (नगर), हौशी नाट्य - विजय जगताप (नाशिक), प्रदीप भोईर (भुसावळ), नाना मोरे (नगर).
प्रकाशयोजना (प्रथम) : बालनाट्य - प्रफुल्ल दीक्षित (नाशिक), हौशी नाट्य - विजय रावल (नाशिक), नेहा पाटील (जळगाव), शेखर वाघ (नगर). द्वितीय : बालनाट्य - श्याम शिंदे (नगर), हौशी नाट्य : ईश्वर जगताप (नाशिक), योगेश जगन्नाथ (जळगाव), सुदर्शन हेंद्रे (नगर).
रंगभूषा (प्रथम) : बालनाट्य - प्रभावती बावस्कर (जळगाव), हौशी नाट्य : माणिक कानडे (नाशिक), संजय चव्हाण (जळगाव), सुनीता शर्मा (नगर), द्वितीय : बालनाट्य - माणिक कानडे (नाशिक), हौशी नाट्य : उल्हेश खंदारे (धुळे), श्रद्धा पाटील (जळगाव), सुनीता वाघ (नगर).
अभिनय गुणवत्ता प्रमाणपत्रे अशी- हौशी नाट्य : नाशिक केंद्र- ज्योती बोराडे, केतकी कुलकर्णी, वासंतिका वाळके, शब्दजा वेलदोडे, प्रशांत हिरे, महेश डोकफोडे, कार्तिक डोंगरे, श्रीराम गोरे. (प्रतिनिधी)

Web Title: Colorful honors in the celebratory ceremony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.