रंगपंचमीचा फिव्हर
By Admin | Updated: March 11, 2015 00:20 IST2015-03-11T00:19:44+5:302015-03-11T00:20:09+5:30
रंगपंचमीचा फिव्हर

रंगपंचमीचा फिव्हर
रंगपंचमीचा फिव्हर
धूलिवंदनापासून सुरू होणाऱ्या वसंतोत्सवाला रंगपंचमीच्या दिवशी पाच दिवस पूर्ण होतात. प्रत्येक सण घरी आनंदच घेऊन येत असतो. धूलिवंदन आणि रंगपंचमीची तर मजा काही औरच. आयुष्य किती रंगीत आहे याची जाणीव करु न देणारा सण. कडक उन्हामध्ये गारवा देणारे रंग (अर्थात हर्बल) पाण्याचे फुगे आणि थंडाई वा वाह. लहान मुलांची तर चांगलीच चंगळ सुरु असते आणि बालपणाचा खरा आनंद देणारा हा सण आल्यामुळे शहरालाही रंगपंचमीचा फिव्हर चढला आहे. त्यामुळे आदल्याच दिवशी बाजारात रंगपंचमीचे वातावरण पसरले होते. विद्यार्थ्यांनी शाळा सुटताच एकमेकांना रंग लावून रंगपंचमी साजरी केली. यंदा चीनमधील अनेक फॅन्सी उत्पादनांनी चिमुरड्यांना भुरळ घातली आहे. टॅन्क, स्पायडरमॅन, आइस्क्रीम, गाड्या, हत्ती, बंदूक, बॅट, प्राणी, पंप यांसह सुमारे ५० प्रकारच्या पिचकाऱ्या बाजारात विक्रीसाठी दाखल झाल्याची माहिती शोभा स्टेशनर्सचे संचालक अनिल नंदवाणी यांनी दिली. २० रुपयांपासून ते ३०० रूपयांपर्यंत पिचकाऱ्यांची किंमत आहे. फॅन्सी पिचकाऱ्यांच्या निर्मितीला चीनमध्ये प्राधान्य देण्यात येत असल्याने चिमुकल्यांमध्येही त्याची क्रेझ आहे.