‘रंग तुझ्या अंतरीचे’
By Admin | Updated: September 29, 2016 00:21 IST2016-09-29T00:21:24+5:302016-09-29T00:21:50+5:30
पुस्तक प्रकाशन : विविध क्षेत्रांतील महिलांचा गौरव

‘रंग तुझ्या अंतरीचे’
नाशिक : समृद्धी बहुद्देशीय सामाजिक संस्थेतर्फे डॉ. कविता बोंडे यांच्या ‘रंग तुझ्या अंतरीचे’ पुस्तकाचे डॉ. अर्चना ठोंबरे, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, मविप्रचे संचालक नाना महाले व डॉ. विलास बोंडे यांच्या उपस्थितीत प्रकाशन करण्यात आले.
कुसुमाग्रज स्मारक येथील समृद्धी संस्थेच्या महिला गुणगौरव सोहळ्यात ‘रंग तुझ्या अंतरीचे’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. पुस्तकाविषयी बोलताना कविता बोंडे म्हणाल्या, महिलांना वेगवेगळ्या परिस्थितीत आपले अस्तित्व सिद्ध करण्यासोबतच आपल्यातील प्रगल्भता आणि परिपक्वता दाखवून देण्याचे आव्हान असते.
अशा परिस्थितीत वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असताना विविध स्त्रियांनी केलेल्या संघर्ष कथा या पुस्तकात मांडण्याचा प्रयत्न केला असून, पुस्तकातील कथा वास्तवाशी साधर्म्य असणाऱ्या असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनीही उपस्थिताना मार्गदर्शन केले. विविध क्षेत्रातील महिलांना पुरस्कार प्रदान करताना विशेष आनंद होत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. महिलांना दैनंदिन जीवनात विविध समस्यांचा सामना करावा लागतो. या सर्व समस्यांवर मात करून आणि कुटुंबासाठी पुरेसा वेळ देऊनही समाजाप्रती काम करणाऱ्या महिला सर्वांसाठी आदर्श निर्माण करीत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. तर डॉ. अर्चना ठोंबरे यांनी स्त्रियांना जन्मापासून ते वृद्धापकाळापर्यंत विविध अवस्थेत कराव्या लागणाऱ्या संघर्षाचे वर्णन केले. सूत्रसंचालन कविता बोंडे यांनी के ले. (प्रतिनिधी)