श्री लक्ष्मीनारायण मंदिराचे रंगरंगोटीने पालटले रूप
By Admin | Updated: July 28, 2015 01:55 IST2015-07-28T01:55:00+5:302015-07-28T01:55:40+5:30
श्री लक्ष्मीनारायण मंदिराचे रंगरंगोटीने पालटले रूप

श्री लक्ष्मीनारायण मंदिराचे रंगरंगोटीने पालटले रूप
नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यात अनेक खालसे आणि आखाड्याचे विशाल मंडप उभे राहत असताना तपोवनातील श्री लक्ष्मीनारायण मंदिराला रंगरंगोटी करण्यात आल्याने त्याचे रूप पालटले आहे.
कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर रामकुंडावरील काही पुरातन मंदिरांची दुरुस्ती करण्यात आली. तसेच काही मंदिराची डागडुजी करून रंगरंगोटीदेखील करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे तपोवनातील बटुक हनुमान मंदिर, लक्ष्मण मंदिर आदि मंदिरांचेदेखील रंगकाम करण्यात आल्याने रूप पालटले आहे. तपोवनातील प्रमुख मानले जाणारे मंदिर म्हणजे श्री लक्ष्मीनारायण मंदिर होय. या मंदिराला गुलाबी रंग देण्यात आला असून, कोरीव नक्षीकाम व कलाकुसर यांनाही रंग देण्यात आला आहे. त्यामुळे मंदिराचे सौंदर्य दुरून भाविकांच्या डोळ्यात भरते. (प्रतिनिधी)