वाहतूक नियोजनाची रंगीत तालीमत्
By Admin | Updated: August 23, 2015 23:34 IST2015-08-23T23:34:15+5:302015-08-23T23:34:49+5:30
र्यंबकेश्वर : तळेगावला रोखली वाहतूक; वाहनांच्या लांबच लांब रांगात्

वाहतूक नियोजनाची रंगीत तालीमत्
र्यंबकेश्वर : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरातील वाहतुकीचे नियोजन युद्धपातळीवर सुरू असताना त्र्यंबकेश्वर येथे मात्र पहिली रंगीत तालीमही घेण्यात आली. येत्या २९ रोजी होणाऱ्या शाहीस्नानासाठी त्र्यंबकेश्वरमध्ये होणारी गर्दी लक्षात घेता पोलिसांनी खंबाळे व पहिने येथे वाहने थांबवून रंगीत तालीम घेतली. वाहनधारकांनी या दोन्ही ठिकाणच्या वाहनतळावरच वाहने उभी करावीत, यासाठी ही रंगीत तालीम घेण्यात आली. वाहनधारकांना खंबाळेपासून पुढे जाता येणार नसल्यामुळे वाहनधारकांनी नजीकच्या वाहनतळावरच वाहने उभी करावी, असे आवाहन करून वाहतुकीवरील ताण कमी करण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे नाशिक, घोटी, इगतपुरी या मार्गावरून त्र्यंबककडे येणाऱ्या वाहनधारकांना अगोदरच वाहनतळाची सूचना देण्यात येत होती. पोलिसांनी अचानक केलेल्या या रंगीत तालीममुळे आलेल्या भाविकांची पायपीट झाली.