महविद्यालयीन विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

By Admin | Updated: September 7, 2014 00:11 IST2014-09-06T22:11:27+5:302014-09-07T00:11:09+5:30

महविद्यालयीन विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

College student drowns death | महविद्यालयीन विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

महविद्यालयीन विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू


घोटी : इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव लक्ष्मीनगर येथील आमदार काशीनाथ मेंगाळ तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज घडली. घोरगाव, ता.भिवंडी येथील मनीष दिनकर पालवे (वय १९) असे त्याचे नाव आहे. आज दुपारी तो मित्रासोबत आश्रमशाळेजवळील डोहात आंघोळ करण्यास गेला गेला असता पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मित्रांनी पाण्यात शोध घेतला मात्र त्यात त्यांना यश आले नाही.
दरम्यान पट्टीच्या पोहणाऱ्या स्थानिक युवकानी त्याचे शव पाण्याबाहेर काढले. संस्थेचे सचिव काशीनाथ मेंगाळ यानी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसानी याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. (वार्ताहर)

Web Title: College student drowns death