कॉलेज रोड बनला ‘बाईक रायडींग’चा आखाडा

By admin | Published: July 10, 2014 10:21 PM2014-07-10T22:21:46+5:302014-07-11T00:21:10+5:30

कॉलेज रोड बनला ‘बाईक रायडींग’चा आखाडा

College Road became the 'Aikda' of 'Bike Raiding' | कॉलेज रोड बनला ‘बाईक रायडींग’चा आखाडा

कॉलेज रोड बनला ‘बाईक रायडींग’चा आखाडा

Next

 
नाशिक - लायसन्स नाही, सिग्नल तोडला, वाहन चालविताना मोबाईलवर बोलत होते अशा एक ना अनेक कारणांमुळे सर्वसामान्यांना वाहतूक पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागते. किंबहुना शहरातून वाहन चालविताना वाहतुकीच्या नियमांचे उल्लघंन केले की, कारवाई ठरलेलीच. नो पार्किंग, एकेरी मार्गावरून वाहतूक, वाहन चालविण्याचा परवाना यासोबतच शहरामध्ये दुचाकी व चारचाकी वाहनांची वेग मर्यादाही ठरविण्यात आली आहे. पण कॉलेजरोड परिसरात कॉलेजकुमार वेग मर्यादेचे बिनधास्त उल्लंघन करीत धूम स्टाइलने दुचाकी पळवत असल्याने वाटसरूंना जीव मुठीत घेऊन या परिसरात वावरावे लागत आहे.
सध्या कॉलेजमध्ये अ‍ॅडमिशन प्रक्रिया सुरू असल्याने तरुण-तरुणींची दिवसभर या परिसरात रेलचेल असल्याने काही टवाळखोर मुलींना इम्प्रेस करण्यासाठी सुसाट गाड्या पळवित आहेत. विशेष म्हणजे हा सर्व प्रकार पोलिसांच्या समोरच घडत असल्याने परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. सध्या कॉलेजरोड परिसरात अकरावी प्रवेशाची लगबग असल्याने पालकही आपल्या पाल्यांसमवेत येत आहेत. परंतु अशाप्रकारे दुचाकी पळविल्या जात असल्याने पालकांनाही धडकी भरत आहे. स्पोर्टस बाइकची क्रेझ
शहरात दररोज विक्र ी होणाऱ्या इतर दुचाकीच्या तुलनेत स्पोर्टस बाइकचा आकडा वाढत आहे. कॉलेज तरूणांची पसंती असलेल्या या स्पोर्टस बाइक सुसाटपणे पळविल्या जात असल्याने येणाऱ्या-जाणाऱ्यांच्या काळजात एकच धडकी भरत आहे. गेल्या काही दिवसांपासून तर हे प्रमाण अधिकच वाढले असून, अशा टवाळखोरांवर पोलिसांनी कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
बाइकवरून मुलींची छेड
घरातून बाहेर पडल्यापासून टवाळखोरांच्या उपद्रवाला तोंड देत, टोमणे ऐकत आणि धक्के खात मुलींचा प्रवास सुरू असतो. स्वत:च्या बाइकवर कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलींचे दु:ख आणखीच वेगळे आहे. धूम स्टाइल रायिडंग साठी मुळातच नाशिकचा कॉलेज रोड बदनाम झाला आहे. एकाच वेळी दहा-वीस जण अतिशय वेगात गाड्या उडवित जात असताना रस्त्यावरच्या सगळ्यांच्याच काळजाचा थरकाप उडतो. त्यातच अशा टवाळखोरांच्या घोळक्यांतून वाट काढत जाणाऱ्या मुलीवर तर बिकट प्रसंग ओढावतो. मुलीला वाहनांच्या गराड्यात घेऊन, घाबरवून सोडण्यात या टवाळखोरांना आसुरी आनंद मिळतो. जोरात गाडी चालवून आधी ओव्हरटेक करायचे, मग अचानक मोठा ब्रेक लावून मागून येणाऱ्या तरु णीला घाबरविण्याचे प्रकार सर्रास होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.

Web Title: College Road became the 'Aikda' of 'Bike Raiding'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.