शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

जेएनयू हल्ला निषेधार्थ नाशकात महाविद्यालये बंदचा इशारा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2020 22:00 IST

दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात झालेल्या हिंसाचाराचे देशभरात पडसाद उमटत असताना नाशिकमधील विविध विद्यार्थी संघटनांनीही एकत्र येत जेएनयूतील हल्ल्याचा निषेध करीत बुधवारी (दि.८) नाशिक शहरातील महाविद्यालये बंद ठेवण्याचा इशारा दिला आहे.

ठळक मुद्देराष्ट्रवादीसह डाव्या विद्यार्थी संघटना एकत्रजेएनयू हल्ल्याच्या निषेधार्थ बुधवारी आंदोलन

नाशिक : दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात झालेल्या हिंसाचाराचे देशभरात पडसाद उमटत असताना नाशिकमधील विविध विद्यार्थी संघटनांनीही एकत्र येत जेएनयूतील हल्ल्याचा निषेध करीत बुधवारी (दि.८) नाशिक शहरातील महाविद्यालये बंद ठेवण्याचा इशारा दिला आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसह छात्रभारती, एआयएसएफ, एसएफ आय, सम्यक विद्यार्थीआंदोलन, आप युवा आघाडी आदी संघटनांनी सोमवारी (दि.६) सायंकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ एकत्र येत केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करीत रोष व्यक्त केला.शहरातील विविध संघटनांच्या विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ एकत्र येऊन निषेध व्यक्त केला. ‘लाठी, गोली की सरकार नही चलेगी’, ‘सरकार विद्यार्थीयो से डरती है, पोलीस को आगे करती है’ यांसह विविध घोषणा देत जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील हिंसाचाराचा निषेध केला. यावेळी एकत्र आलेल्या विद्यार्थी संघटनांनी या आंदोलनाला आणखी तीव्र करण्याचा निर्धार केला असून, त्यासाठी शहरातील महाविद्यालये बंद ठेवण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले आहे. तसेच विद्यार्थ्यांनी केंद्र सरकार, भारतीय जनता पक्षाचा निषेध करणारे फलक हाती घेतानाच दिल्लीत पोलिसांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत असून, देश हुकूमशाहीकडे वाटचाल  करत असल्याचा आरोपही विद्यार्थ्यांनी केला. यावेळी विराज देवांग, योगेश कापसे, तल्हा शेख, स्वप्नील घिया, भूषण काळे, प्रसाद देशमुख, समाधान बागुल, अविनाश दोंदे, गायत्री परदेशी, आस्था मांदळे, ऐश्वर्या कोळे यांच्यासह विविध विद्यार्थी  संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

टॅग्स :jnu attackजेएनयूNashikनाशिकStudentविद्यार्थीagitationआंदोलनcollegeमहाविद्यालय