कलेक्टर कचेरीवर पेन्शनधारकांचा मोर्चा
By Admin | Updated: August 27, 2016 23:27 IST2016-08-27T23:26:32+5:302016-08-27T23:27:14+5:30
कलेक्टर कचेरीवर पेन्शनधारकांचा मोर्चा

कलेक्टर कचेरीवर पेन्शनधारकांचा मोर्चा
पिंपळगाव बसवंत : येथील पेन्शनधारकांची बैठक संपन्न होऊन त्यामध्ये महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली.
येथील पोलीस ठाण्याजवळील श्रीदत्त मंदिरात पिंपळगाव परिसरातील सर्व पेन्शनरांची बैठक घेण्यात आली. या ईपीएफ पेन्शनधारकांना ६५०० रुपये महागाई हप्ता द्यावा. तसेच खासदार भगतसिंग कोशारी कमिटीने केलेल्या शिफारशीनुसार दरमहा ३००० रुपये द्यावे, महागाई भत्ता, पेन्शन त्वरित लागू करावा आदि विषयांवर चर्चा करण्यात आली. तसेच पेन्शनरांच्या विविध प्रश्नांचा पाठपुरावा करण्याकरिता येत्या मंगळवारी (दि. ३०) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचे निश्चित करण्यात आले.