जिल्हाधिकारी सूरज मांढरे कोरोना पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:11 IST2021-07-04T04:11:18+5:302021-07-04T04:11:18+5:30
मागील आठवड्यात ते पुण्याहून परतले होते. तर दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या जिल्ह्याच्या काेरोना आढावा बैठकीलाही ...

जिल्हाधिकारी सूरज मांढरे कोरोना पॉझिटिव्ह
मागील आठवड्यात ते पुण्याहून परतले होते. तर दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या जिल्ह्याच्या काेरोना आढावा बैठकीलाही ते उपस्थित होते. शुक्रवारी स्मार्ट सिटीच्या बैठकीलाही त्यांनी हजेरी लावली. त्यामुळे त्यांनी संपर्कात आलेल्या अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिकांनी आपली चाचणी करवून घ्यावी, असे आवाहन केले आहे.
जिल्ह्यातील पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत कोरोनाची स्थिती हाताळताना जिल्हाधिकारी सातत्याने नागरिकांच्या संपर्कात राहिले. पहिल्या लाटेत हॉटस्पॉट ठरलेल्या मालेगावची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली होती. तर दुसऱ्या लाटेत उद्भवलेली ऑक्सिजनची स्थिती नियंत्रणात आणण्यासाठीही आपत्ती व्यवस्थापनाचे प्रमुख म्हणून त्यांची महत्त्वाची भूमिका राहिली.
लसीकरणाची मोहीम सुरू झाल्यानंतर त्यांनी बिटको रुग्णालयात जाऊन लसीचा पहिला डोस घेतला होता. नियमानुसार त्यांनी दुसरा डोसही पूर्ण केला आहे. कोरोनाच्या काळातही त्यांचे प्रशासकीय कामकाज सुरू होते. दरम्यान, शुक्रवारी (दि. २) दिवसभर त्यांना कोणताही त्रास जाणवला नाही. रात्री घसा दुखू लागल्याने त्यांनी सकाळी चाचणी करून घेतली असता त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला.