कलेक्टर म्हणाले ‘रोल, कॅमेरा, ॲक्शन’ , तर सीपींनी वाजवला मुहुर्ताचा ‘क्लॅप’ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:19 IST2021-08-21T04:19:11+5:302021-08-21T04:19:11+5:30

नमामि गोदा फाऊंडेशनच्या पुढाकाराने नाशिक जिल्हयातील कलाकार आणि तंत्रज्ञांना रोजगाराचे दालन उपलब्ध व्हावे, यासाठी सर्वप्रकारच्या चित्रीकरणांना जिल्ह्यात परवानगी देण्याची ...

The collector said ‘roll, camera, action’, while the CP played the ‘clap’ of the moment! | कलेक्टर म्हणाले ‘रोल, कॅमेरा, ॲक्शन’ , तर सीपींनी वाजवला मुहुर्ताचा ‘क्लॅप’ !

कलेक्टर म्हणाले ‘रोल, कॅमेरा, ॲक्शन’ , तर सीपींनी वाजवला मुहुर्ताचा ‘क्लॅप’ !

नमामि गोदा फाऊंडेशनच्या पुढाकाराने नाशिक जिल्हयातील कलाकार आणि तंत्रज्ञांना रोजगाराचे दालन उपलब्ध व्हावे, यासाठी सर्वप्रकारच्या चित्रीकरणांना जिल्ह्यात परवानगी देण्याची मागणी जिल्हाधिकारी तसेच पोलीस आयुक्तांकडे करण्यात आली होती. चिन्मय उदगीरकर, किरण भालेराव, राजेश पंडित, सचिन शिंदे यांनी त्यासाठी दोन्ही अधिकाऱ्यांची भेट घेऊन चित्रीकरणाचा मुहूर्त त्यांच्या हस्ते करण्याचीही गळ घातली. त्यामुळे जिल्हाधिकारी मांढरे आणि पोलीस आयुक्त पांडे्य यांनी स्वत: सिरीयलच्या चित्रीकरणास उपस्थित राहून चित्रीकरणाचा मुहुर्त केला. भारतीय सिनेमाचे जनक असलेल्या दादासाहेब फाळके यांच्या या नगरीत पुन्हा चित्रीकरणांना सुगीचे दिवस आल्यास एकप्रकारे ती त्यांना आदरांजली ठरेल, असे मांढरे यांनी यावेळी सांगितले. अधिकाधिक निर्मात्यांनी नाशिकला चित्रीकरणाचे प्रस्ताव द्यावेत, आम्ही त्यांना प्रशासकीय स्तरावरून सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचेही मांढरे यांनी नमूद केले तर पोलीस आयुक्त पांडे्य यांनीही सर्वतोपरी सहाय्य करण्याचे आश्वासन दिले. यावेळी प्रसिद्ध अभिनेते राणादा ऊर्फ हार्दिक जोशी, अमृता पवार, दिग्दर्शक सचिन शिंदे, रवी जन्नावार, राहुल रायकर, आदिनाथ ढाकणे, प्रकाश वाघ आणि नाशिकचे अनेक कलाकार, तंत्रज्ञ यावेळी उपस्थित होते.

फोटो (२० कलेक्टर, २०सीपी)

दिग्दर्शकांच्या भूमिकेत जिल्हाधिकारी सूरज मांढरे. समवेत चिन्मय उद्गीरकर.

दुसऱ्या छायाचित्रात क्लॅप वाजवताना पोलीस आयुक्त दीपक पांडे्य.

Web Title: The collector said ‘roll, camera, action’, while the CP played the ‘clap’ of the moment!