जिल्हाधिकाऱ्यांना चिकुन गुन्याची लागण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:14 IST2021-09-25T04:14:30+5:302021-09-25T04:14:30+5:30

गेल्या मंगळवारी जिल्हाधिकारी रजेवर होते. त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून त्यांनी नियमित कामकाजाला सुरुवातही केली. गुरुवारी त्यांनी कार्यालयात नियमित बैठका आणि ...

Collector infected with Chikun crime | जिल्हाधिकाऱ्यांना चिकुन गुन्याची लागण

जिल्हाधिकाऱ्यांना चिकुन गुन्याची लागण

गेल्या मंगळवारी जिल्हाधिकारी रजेवर होते. त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून त्यांनी नियमित कामकाजाला सुरुवातही केली. गुरुवारी त्यांनी कार्यालयात नियमित बैठका आणि कामकाज केले. मात्र दुपारनंतर त्यांना काहीसा त्रास जाणवू लागला. शुक्रवारी सकाळी त्यांना अधिक त्रास जाणवू लागल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ते खासगी रुग्णालयात दाखल झाले. त्यामुळे शुक्रवारी पालकमंत्र्यांच्या आढावा बैठकीलादेखील ते उपस्थित राहू शकले नाही. बैठकीला अनुपस्थित राहिल्याने अनेकांनी याबाबत विचारणा केल्यानंतर त्यांची प्रकृती ठीक नसल्याचे

समजले.

जिल्हाधिकाऱ्यांनी यापूर्वी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती नियंत्रणात असल्याची समाधानकारक बाब असली तरी चिकुन गुन्या आणि डेंग्यूने डोके वर काढल्याने आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे. नागपूरनंतर नाशिकमध्ये सर्वाधिक चिकुन गुन्या आणि डेंग्यूचे रुग्ण आढळून आल्याने पालकमंत्र्यांनीदेखील महापालिकेला उपायोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Web Title: Collector infected with Chikun crime

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.