जिल्हाधिकारीच आरोपीच्या पिंजऱ्यात
By Admin | Updated: July 22, 2016 00:55 IST2016-07-22T00:48:10+5:302016-07-22T00:55:50+5:30
प्रांत अधिकाऱ्याचा निष्कर्ष : भरतीत फेरमुलाखतीची शिफारस

जिल्हाधिकारीच आरोपीच्या पिंजऱ्यात
नाशिक : पोलीसपाटील भरतीतील गैरप्रकारावर हतबल झालेल्या जिल्हाधिकाऱ्यांनीच सिन्नर व निफाड तालुक्यातील तक्रारदारांच्या फेरतोंडी मुलाखती घ्याव्यात, अशी शिफारस करतानाच, निफाड प्रांत अधिकाऱ्याने तोंडी मुलाखतीसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी ठरवून दिलेला गुणदानाचा तक्ता, नमुना अथवा लेखी आदेश मुलाखत समितीस मिळालेलाच नाही, असे सांगत जिल्हाधिकाऱ्यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे.
निफाड व सिन्नर तालुक्यातील पोलीसपाटील भरतीबाबत झालेल्या तक्रारीच्या आधारे जिल्हाधिकाऱ्यांनी प्रांत अधिकाऱ्यास अन्याय झालेल्या अकरा उमेदवारांच्या फेरमुलाखती घेण्याचे आदेश दिले होते. प्रत्यक्षात प्रांत अधिकाऱ्याने फेर मुलाखती घेण्याऐवजी ज्यांच्या तक्रारी आहेत, त्यांच्या कागदपत्रांची फेर तपासणी केली व त्यापैकी सहा गावांतील उमेदवारांना पुन्हा अपात्र ठरवित, आपला अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला आहे. या अहवालात निफाड प्रांत अधिकाऱ्याने जिल्हाधिकाऱ्यांनी ठरवून दिलेल्या गुणदानाची पद्धत विचारात घेतली नसल्याचे खुलेपणाने कबूल केले असून, उमेदवारांच्या तोंडी मुलाखतींसाठी अपेक्षित असलेल्या गुणांबाबत कुठल्याही स्वरूपाचे लेखी आदेश अथवा तक्ता, नमुना मुलाखत समितीस प्राप्त झाले नसल्याचे म्हटले आहे. याचाच अर्थ जिल्ह्यात या परीक्षेसाठी एकच पॅटर्न असावा यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व प्रांत अधिकाऱ्यांना गुणदानाचा तक्ता ठरवून दिल्याचा जो काही दावा यापूर्वी करण्यात आला. (प्रतिनिधी)