तहसीलदार संघटनेचे सामूहिक रजा आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:42 IST2021-02-05T05:42:47+5:302021-02-05T05:42:47+5:30

नाशिक : यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथील नायब तहसीलदारावर वाळू माफियाने केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ नाशिक जिल्ह्यातील तहसीलदार संघटनेने रजा आंदोलन ...

Collective leave movement of tehsildar organization | तहसीलदार संघटनेचे सामूहिक रजा आंदोलन

तहसीलदार संघटनेचे सामूहिक रजा आंदोलन

नाशिक : यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथील नायब तहसीलदारावर वाळू माफियाने केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ नाशिक जिल्ह्यातील तहसीलदार संघटनेने रजा आंदोलन पुकारले. मंगळवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संघटनेच्यावतीने निदर्शने देखील करण्यात आली. यावेळी वाळू माफियावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

यवतमाळ येथील नायब तहसीलदार वैभव पवार यांच्यावर वाळू माफियाने जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली. या घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेच्यावतीने रजा आंदोलन पुकारण्यात आले. नाशिक जिल्ह्यातील तहसीलदार आणि नायब तहसीलदार या आंदोलनात सहभागी झाले आहेत. याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. निवेदनावर निवासी उपजि्ल्हाधिकारी भागवत डोईफोडे, उपजिल्हाधिकारी अरविंद अंतुर्लीकर, नितीन मुंडावरे, अरविंद नरसीकर, राजेंद्र नजन, एस. ए. आवळकंठे, रचना पवार, पल्लवी जगताप आदींच्या स्वाक्षरी आहेत.

(फोटो:०२पीएचएफबी६३)

Web Title: Collective leave movement of tehsildar organization

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.