मखमलाबादला ३५०० वर मूर्ती संकलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:16 IST2021-09-21T04:16:00+5:302021-09-21T04:16:00+5:30
मातोरी : मखमलाबाद येथील जिजाई युवा फाउंडेशनच्यावतीने महादेव बाग येथे मूर्ती संकलन संकल्पना घेण्यात आली आणि सुमारे तीन ...

मखमलाबादला ३५०० वर मूर्ती संकलन
मातोरी : मखमलाबाद येथील जिजाई युवा फाउंडेशनच्यावतीने महादेव बाग येथे मूर्ती संकलन संकल्पना घेण्यात आली आणि सुमारे तीन हजार पाचशेच्या वर मूर्ती संकलित झाल्या. त्यानंतर सर्व मूर्तींचे शास्रोक्त पद्धतीने विसर्जन करण्यात आले. मखमलाबाद परिसरातील गणेश विसर्जन न करता यावेळी मखमलाबाद जिजाई युवा फाउंडेशनच्यावतीने मखमलाबाद पाटा जवळ महादेव बाग सर्वज्ञ कॉम्प्लेक्ससमोर कृत्रिम तलाव तयार करण्यात आला व यात नागरिकांना विसर्जन सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याने नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला असून, या केंद्रात पाच वाजेपर्यंत सुमारे ३५०० मूर्ती संकलित करून घेण्यात आल्या. त्यांच्या "देव द्या, देवपण घ्या, प्रदूषण टाळूया निसर्गाला मदत करूया" या योजनेला निसर्ग प्रेमी भाविकांनी दिलेला प्रतिसाद मोलाचा ठरल्याचे मंडळाचे अध्यक्ष प्रमोद पालवे यांनी सांगितले. यावेळी महेश मानकर, संदीप धात्रक, श्याम काकड, राहुल बोडके ,नाना दरगोडे ,विक्रम काकड, प्रमोद काकड ,विश्वनाथ काकड, नाना बोराडे, प्रताप पालवे आदींनी सहकार्य केले.