पाचच दिवसात कोसळले काम
By Admin | Updated: March 5, 2017 00:43 IST2017-03-05T00:42:51+5:302017-03-05T00:43:06+5:30
खामखेडा : कडवा धरण उपविभाग अंतर्गत सुळे डाव्या कालव्यावर पिळकोस शिवारात बांधण्यात येत असलेल्या सायपन कॉँक्रीट विहिरीचे काम अवघ्यात पाच दिवसात कोसळ्याने ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

पाचच दिवसात कोसळले काम
खामखेडा : कडवा धरण उपविभाग अंतर्गत सुळे डाव्या कालव्यावर पिळकोस शिवारात बांधण्यात येत असलेल्या सायपन कॉँक्रीट विहिरीचे काम अवघ्यात पाच दिवसात कोसळ्याने ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
कडवा धरण उपविभागअंतर्गत सुळे डाव्या कालव्याचे कालवा तसेच वितरकांच्या रेंगाळलेल्या कामामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप आहे. आठ वर्षे उलटूनही कालव्याला हक्काचे आवर्तन मिळत नाही. त्यातच कालव्याच्या सुरू असलेल्या कामात संबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळे संबंधित काम करणाऱ्या ठेकेदारांचे चांगलेच उखळ पांढरे होत आहे.
सदर कालव्यास पिळकोस शिवारातून निघालेल्या वितरिका
क्रमांक आठचे काम अतिशय संथ गतीने सुरू आहे. पाच वर्षांपासून सुरू असलेले काम आजमितीसही पूर्णत्वास नाही. या वितरिकेचे फांगदर रस्त्याला लागून असलेल्या गट नंबर १३५ मधील नाल्यावर पाइप असल्याने येथील शेतकऱ्यांना ये - जा करण्यासाठी अडथळा ठरत होते. त्यामुळे या नाल्यावर सायपन करण्यात आले. या सायपनसाठी पाइपच्या दोघा बाजूस असणाऱ्या कॉँक्र ीट विहिरींचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने अवघ्या चार पाच दिवसातच पूर्व बाजूची विहीर आपोआप कोसळली. या ठिकाणी विहिरींच्या बांधकामात लोखंडाचा वापर न करता संबंधित काम करणाऱ्या ठेकेदाराकडून फक्त सिमेंट व वाळू खडीचा वापर केल्याने जमिनीपासून वर असलेल्या दहा फूट उंच बांधकाम आठवडाभरात कोसळले आहे. खामखेडा येथील काळखडी ते फांगदर रस्त्यालगत असलेल्या नाल्यातील वितरिका क्रमांक आठचे काम आपोआप कोसळल्याने संबंधित विभागाने केलेल्या दुर्लक्षाचे व ठेकेदारावरील मेहरबानीचे ग्रामस्थांनी तीव्र निषेध व्यक्त करत संबंधित कामाच्या चौकशीची मागणी केली आहे. (वार्ताहर)