ब्राह्मणगावी घरांची पडझड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:18 IST2021-09-09T04:18:20+5:302021-09-09T04:18:20+5:30
पावसाळा सुरू होऊन दोन अडीच महिने पावसाने या भागात पूर्णत दांडी मारली होती. शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्यावर खरीप हंगामाच्या पिकांची ...

ब्राह्मणगावी घरांची पडझड
पावसाळा सुरू होऊन दोन अडीच महिने पावसाने या भागात पूर्णत दांडी मारली होती. शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्यावर खरीप हंगामाच्या पिकांची लागवड केली होती. खरिपाची पिके हातची जातात की काय, अशी अवस्था असताना गेल्या आठवड्यापासून परिसरात मध्यम स्वरूपाच्या का असेना पावसाने हजेरी लावून पिके तरल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. त्यातच सोमवार मंगळवारच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने गावातील सर्व नाल्यांना पहिल्यांदाच पूर आला. तसेच गावात एकवीरा ज्वेलर्ससह अन्य दोन ठिकाणी घरांच्या भिंती पडल्या आहेत. कुणास इजा झाली नाही. रात्रभर सुरू असलेल्या पावसामुळे जनावरांचे हाल झालेत. बुधवारी सकाळी पावसाने ११ वाजेपर्यंत उघडीप दिली; मात्र त्यानंतर पुन्हा पावसाची रीप रिप सुरू झाली. पावसाने अशीच दमदार हजेरी लावल्यास विहिरींच्या पाण्याची पातळी वाढण्यास मदत होणार असून, रब्बी हंगामाच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.
फोटो - ०८ ब्राह्मणगाव रेन/१
ब्राह्मण गाव येथे मंगळवारी रात्रभर झालेल्या पावसामुळे गावात पडझड झालेली घरे.
080921\08nsk_11_08092021_13.jpg~080921\08nsk_12_08092021_13.jpg
फोटो - ०८ ब्राह्मणगाव रेन/१~फोटो - ०८ ब्राह्मणगाव रेन १