अस्ताणे परिसरात थंडीचा कडाका
By Admin | Updated: December 25, 2015 00:04 IST2015-12-24T23:57:15+5:302015-12-25T00:04:08+5:30
अस्ताणे परिसरात थंडीचा कडाका

अस्ताणे परिसरात थंडीचा कडाका
अस्ताणे : मालेगाव तालुक्यातील अस्ताणे परिसरात थंडीचा कडाका वाढला असून, ठिकठिकाणी शेकोट्यांभोवती आबालवृद्धांच्या गप्पा रंगू लागल्या आहेत. संपूर्ण परिसर गारठला असून, थंडीचा तडका वाढत आहे.
सकाळी ८ वाजेपर्यंत लोक घराबाहेर पडत नसल्याने गावात अघोषित संचारबंदी लागू झाली आहे. त्याचा परिणाम
दैनंदिन जीवनावर दिसू लागला
आहे. वाढत्या थंडीमुळे रब्बी हंगामातील गहू, हरभरा आदि पिकांना त्याचा फायदा होणार असून, दुग्ध व्यवसायावर परिणाम होणार
आहे.
स्वेटर, कानपट्टी, मफलर, रुमाल, जॅकीट याचा वापर थंडीपासून बचाव करताना ग्रामस्थ दिसत आहेत. यात कडाक्याच्या थंडीचा आरोग्यावरही विपरीत परिणाम होत असून, लोकांना डोकेदुखी, सर्दी, खोकला अशा आजारांनी ग्रासले आहे. (वार्ताहर)