ढगाळ वातावरण शेतकऱ्यांना लागली चिंता
By Admin | Updated: April 11, 2015 00:15 IST2015-04-11T00:15:25+5:302015-04-11T00:15:43+5:30
ढगाळ वातावरण शेतकऱ्यांना लागली चिंता

ढगाळ वातावरण शेतकऱ्यांना लागली चिंता
नाशिक : जिल्ह्यात अनेक भागांत ढगाळ वातावरण आणि होणाऱ्या बेमोसमी पावसामुळे शेतकऱ्यांना पिकाची चिंता लागली आहे. मागील महिन्यात झालेल्या बेमोसमी पाऊस आणि गारपिटीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची पिके धोक्यात आली होती; परंतु त्यानंतर शासनाची मदत आणि निसर्गानेही हात दिल्यानंतर शेतकरी सावरत असतानाच पुन्हा एकदा पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांना पिकांची चिंता लागली आहे. जिल्ह्यात टप्प्याटप्याने पाऊस होत असल्याने अनेक पिकांचे नुकसान झाले आहे. भाजीपाला आणि फळभाज्यांचेदेखील नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांना मोठी चिंंता लागली आहे. हवामान खात्याने आगामी चोवीस तासात पुन्हा पावसाची शक्यता वर्तविल्यामुळे शेतकऱ्यांपुढे मोठा प्रश्न उभा राहिला आहे. दरम्यान, शुक्रवारी जिल्ह्यातील काही प्रमाणात पाऊस झाल्याने गार वारे वाहत होते. (प्रतिनिधी)