पांडाणे येथे आढळला कोब्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2016 00:02 IST2016-03-09T23:39:26+5:302016-03-10T00:02:36+5:30
पांडाणे येथे आढळला कोब्रा

पांडाणे येथे आढळला कोब्रा
पांडाणे : दिंडोरी तालुक्यातील पांडाणे येथील उत्तमराव वामनराव देवरे यांच्या राहत्या घराजवळ बाडगीच्या पाडा येथील सर्पमित्र भगवान सीताराम पवार यांनी कोब्रा जातीचा सर्प पकडला. देवरे हे त्यांच्या गट नं ५३ मधील रिकामे कॅरेट स्टोअर रूममध्ये काम सुरू आसताना रूममध्ये कोंब्रा जातीचा सर्प दिसला. त्यांनी सर्पमित्र पवार कळविले. पवार यांनी घटनास्थळी धाव घेऊन कोब्रा पकडून जंगलात सोडून दिला.
दिंडोरी तालुक्यात कोंब्रा, मानियार, स्पटीककोंब्रा, घोणस या विषारी जातीचे सर्प आढळतात .तसेंच सर्प हा शेतकऱ्यांचा मित्र असल्यामुळे शेतकऱ्यांनी सर्प न
मारता सर्प मित्राला बोलावून तो पकडून जंगलात सोडावा असे आवाहन सर्पिमत्र भगवान पवार यांनी केले आहे. (वार्ताहर )