देवळा, घोटी वगळता आठ बाजार समित्यांची निवडणूक होणार सहकार मंत्र्यांचा दणका

By Admin | Updated: November 9, 2014 00:08 IST2014-11-09T00:05:02+5:302014-11-09T00:08:14+5:30

देवळा, घोटी वगळता आठ बाजार समित्यांची निवडणूक होणार सहकार मंत्र्यांचा दणका

Coalition bureaucrats will be elected to eight market committees except Deola and Ghoti | देवळा, घोटी वगळता आठ बाजार समित्यांची निवडणूक होणार सहकार मंत्र्यांचा दणका

देवळा, घोटी वगळता आठ बाजार समित्यांची निवडणूक होणार सहकार मंत्र्यांचा दणका

  नाशिक : सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील शंभर कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुका जाहीर केल्या असून, त्याचा सर्वाधिक फटका नाशिकला बसणार आहे. जिल्'ातील देवळा व घोटी कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा अपवाद वगळता जवळपास सर्वच कृषी उत्पन्न बाजार समित्यांची मुदत संपत असल्याने तब्बल आठ बाजार समित्यांची निवडणूक डिसेंबरअखेर होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. आघाडी सरकारच्या काळात लोकसभा व विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जिल्'ासह राज्यातील बहुतांश कृषी उत्पन्न बाजार समित्यांना सहा-सहा महिने मुदतवाढ देण्यात आली होती. तिही मुदत आता काही बाजार समित्यांची संपली असून, काहींची नोव्हेंबरअखेर संपणार आहे. त्यामुळे जिल्'ातील आठ बाजार समित्यांची निवडणूक डिसेंबर अखेरपर्यंत अटळ मानली जात आहे. जिल्'ातील उमराणे व मालेगाव बाजार समित्यांवर सध्या प्रशासकीय मंडळ कार्यरत आहे. मालेगावची सुनावणी १९ नोव्हेंबरला, तर उमराणे बाजार समितीची सुनावणी मंगळवारी (दि.११) होणार आहे. जिल्'ातील मुदत संपलेल्या कृषी उत्पन्न बाजार समित्या व त्यांची संपलेली मुदत अशी- नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची मुदत १६ नोव्हेंबर २०१४ अखेरपर्यंत आहे. कळवण - २७ जुलै २०१३, सिन्नर - ३० सप्टेंबर २०१३, पिंपळगाव (ब) - ३० जून २०१३, नांंदगाव - २० आॅगस्ट २०१३, मनमाड २८ डिसेंबर २०१३, येवला - ५ डिसेंबर २०१३, चांदवड - २ सप्टेंबर २०१३ पर्यंत मुदत होती. त्यामुळे या सर्व बाजार समित्यांची मुदत संपली असताना त्यांना सहा महिने मुदतवाढ देण्यात आली होती. तिही आता संपली आहे.

Web Title: Coalition bureaucrats will be elected to eight market committees except Deola and Ghoti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.