शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

एकलहरेसह राज्यातील  वीज केंद्रांना कोळशाचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2018 00:54 IST

सणासुदीत विजेची मागणी वाढलेली असतानाच राज्यातील वीजनिर्मिती केंद्रांसमोर कोळशाचे संकट उभे ठाकल्यामुळे वीजनिर्मितीचे मोठे आव्हान महाजनको पुढे उभे ठाकले असून, सर्वच केंद्रांवर सरासरी दीड ते दोन दिवस पुरेल एवढाच कोळशाचा साठा असल्यामुळे काळजीत भर पडली आहे.

एकलहरे : सणासुदीत विजेची मागणी वाढलेली असतानाच राज्यातील वीजनिर्मिती केंद्रांसमोर कोळशाचे संकट उभे ठाकल्यामुळे वीजनिर्मितीचे मोठे आव्हान महाजनको पुढे उभे ठाकले असून, सर्वच केंद्रांवर सरासरी दीड ते दोन दिवस पुरेल एवढाच कोळशाचा साठा असल्यामुळे काळजीत भर पडली आहे.  राज्यातील महानिर्मितीकडे सरासरी ३ लाख ४० हजार मेट्रिक टन इतका कोळसा उपलब्ध असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे कोळशाअभावी महानिर्मितीच्या संचांची निर्मिती क्षमता असूनही पुरेशी वीज निर्मिती होऊ शकत नाही. राज्यातील सर्वच ग्रिडमध्ये ५ हजार मेगावॉट विजेची उपलब्धता होईल, असे आश्वासन सरकार देत असले तरी, प्रत्यक्षात कोळशाअभावी पुरेशी वीज निर्मिती होऊ शकत नसल्याने हे आश्वासन महानिर्मिती कसे पुरे करणार, असा प्रश्न उभा ठाकला आहे. मिळालेल्या माहितीनुसार सध्या चंद्रपूरच्या केंद्रात १० हजार मेट्रिक टन, पारस व नाशिक केंद्रात ९ हजार मेट्रिक टन कोळसाचा साठा असून, हा साठा अवघ्या दीड ते दोन दिवस पुरेल, असे सांगण्यात येते.  राज्यात सध्या सणासुदीच्या दिवसात विजेची मागणी वाढली असून, त्याप्रमाणात मात्र वीज उत्पादन होत नसल्याने नागरिकांना भारनियमनाला सामोरे जावे लागत आहे. ग्रामीण भागात ८ ते १२ तास भारनियमन सुरू असून, येत्या दोन दिवसात पुरेसा कोळसा उपलब्ध झाला नाही तर वीज उत्पादनावर गंभीर परिणाम होऊन भारनियमन वाढण्याची शक्यता आहे. चंद्रपूरच्या केंद्राजवळच कोळशाच्या खाणी असल्यामुळे त्यांचे संकट फारसे गंभीर नसले तरी, नाशिकच्या केंद्राचे अंतर पाहता कोळसा वेळेत मिळणे गरजेचे झाले आहे. अशातच सर्वच केंद्रांना टंचाई असेल तर नाशिकची गरज कशी पूर्ण होईल, असा प्रश्न येथील अधिकाऱ्यांना पडला आहे. सध्या नाशिकच्या केंद्रात दीड ते दोन दिवस पुरेल एवढाच कोळसा असून, संच क्रमांक ३ व ४ हे प्रत्येकी १५० मेगावॉट वीज निर्मिती करीत आहेत. संच क्रमांक ५ स्टँडबाय आहे.खासगी कंपनीच्या कोळशाचे काय झाले?नाशिकच्या तीन संचांपैकी एका संचाचा कोळसा खासगी कंपनीकडे आठ महिन्यांच्या कराराने वळविण्यात आला होता. तेव्हा वीज क्षेत्र बचाव कृती समितीने आंदोलन केले होते. मात्र आता तो आठ महिन्यांचा करार संपुष्टात आला असून, वळविलेला कोळसा कोठे गेला, असा प्रश्न अधिकारी व कर्मचारी करू लागले आहेत. स्थानिक पातळीवर याची कोणतीही माहिती नाही.

टॅग्स :electricityवीजPower Shutdownभारनियमन