पतसंस्था संचालकांचा घेराव
By Admin | Updated: November 13, 2016 01:07 IST2016-11-13T01:00:07+5:302016-11-13T01:07:25+5:30
भरणा स्वीकारावा : आर्थिक पुरवठ्याची मागणी

पतसंस्था संचालकांचा घेराव
राशिवडे : भोगावती साखर कारखान्यावर प्रशासक आल्याने अनागोंदी कारभाराला आळा बसेल असे वाटत असताना ‘भोगावती’चा कारभार मात्र आर्थिक खाईत रुतत चालला आहे. जंबो भरती करूनही कुशल कामगार पाहिजेत या नावाखाली सेवानिवृत्त कामगारांना परत कामावर रुजू करून घेतले आहे.
अधिकाऱ्यांची मनमानी आणि प्रशासकांच्या दुर्लक्षाने ‘भोगावती’चा यावर्षीचा गळीत हंगाम निर्विघ्न व पुढील गळीत हंगामात कारखाना चालू होणार काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारखाना आर्थिक संकटातून जात असताना जंबो भरती होऊनही कंत्राटी कामगार नेमायचे, अधिकाऱ्यांनी काटकसरीचा कारभार न करता आपली व सग्यासोयऱ्यांची सोय पाहायची यामुळे आधीच डबघाईला आलेल्या कारखान्याला पुन्हा आर्थिक अरिष्टात रुतवायचे काम सुरू आहे.
‘भोगावती’ची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मागील हंगामात नवीन ५८० जणांची जंबो नोकर भरती झाली; मात्र तज्ज्ञ कामगारांच्या नावावर संचालक मंडळाने अकुशल नातेवाइकांची वर्णी लावली. तज्ज्ञ नसल्याने बॉयलर विभागात वीस, तर उत्पादन विभागाकडे दहा सेवानिवृत्त कामगारांना मासिक पंधरा हजार रुपये पगारावर पुन्हा कामावर घेतले आहे. नवीन नऊ अधिकाऱ्यांनी आपला पगार वाढवून घेतला. हे करताना कोणत्या ठरावाने पगारवाढ घेतली हे प्रशासकीय संचालक मंडळास माहिती नसल्याचे स्पष्ट होत आहे.
पूर्णवेळ प्रशासक असूनही दुपारनंतर येणारे प्रशासक, जंबो नोकर भरती करूनही कंत्राटी कामगारांकडून होत असलेले काम यामुळे ‘भोगावती’च्या प्रशासनाच्या कामाबाबत शंका उत्पन्न होत आहे. कार्यक्षेत्रात तज्ज्ञ युवकांची फौज असताना सेवानिवृत्तांना पुन्हा का बोलावून घेतले हा संशोधनाचा विषय आहे. कार्यक्षेत्रात अन्य कारखान्यांच्या ऊसतोड टोळ्या उतरल्याने ऊस बाहेर जाऊ लागला आहे. या हंगामात भोगावती प्रशासनाने पाच लाख टन गळिताचे उद्दिष्ट ठेवले आहे. हे आव्हान कसे पेलणार हा प्रश्न आहे. (वार्ताहर)