सहकार करंडक वक्तृत्व स्पर्धेला प्रारंभ
By Admin | Updated: October 6, 2015 23:21 IST2015-10-06T23:20:42+5:302015-10-06T23:21:23+5:30
साक्षी बर्वे, सागर रौंदळ आपल्या गटात विजयी

सहकार करंडक वक्तृत्व स्पर्धेला प्रारंभ
इंदिरानगर : कल्याणी महिला नागरी सहकारी संस्था व डे केअर सेंटर कनिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने सहकार करंडक वक्तृत्व स्पर्धा उत्साहात संपन्न झाली.
कनिष्ठ महाविद्यालयीन गटातील प्रथम क्रमांक साक्षी बर्वे हिने पटकाविला. द्वितीय क्रमांक साक्षी शेवाळे, तर तृतीय मोनिका बोराडे, नीलम पटेल व राजेश कनोजिया (उत्तेजनार्थ) यांना बक्षिसे जाहीर झाली.
वरिष्ठ गटात सागर रौंदळ यांनी प्रथम क्रमांक मिळविला. नामदेव पवार आणि शुभम शर्मा व कावेरी सोनवणे यांनी अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळविला, तर कावेरी अहेर आणि विद्या आव्हाड यांनी उत्तेजनार्थ बक्षीस मिळविले.
‘शतकोत्तर सहकार चळवळ दिशादर्शी की दिशाहीन’ तसेच सहकार क्षेत्रात युवकांचा सहभाग, ९७वी घटना दुरुस्ती सहकाराचे प्रश्न सोडविण्यासाठी पुरेशी आहे का? या तीन विषयांवर सदर स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
स्पर्धेसाठी धनलक्ष्मी कनिष्ठ महाविद्यालय, समता कनिष्ठ महाविद्यालय, टेहरे एनबीटी लॉ कॉलेज, एन. नाईक, ग्रामोदय, इगतपुरी महाविद्यालय, सीएमसी महाविद्यालय, डे केअर महाविद्यालय या कनिष्ठ महाविद्यालयांतील सुमारे ४५ विद्यार्थ्यांनी यात सहभाग नोंदविला. तसेच शशिकांत कुलकर्णी, अस्मिता वैद्य, साधना गोखले, सुमंगल कुलकर्णी यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष ल. जी. उगावकर, सचिव गोपाळ पाटील, अॅड. अंजली पाटील, पूजा उगावकर, सुरेखा पैठणे, डॉ. मुग्धा सापटणेकर, सतीश पुरोहित आदि उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सारिका पारखी यांनी केले. यावेळी महाविद्यालयीन विद्यार्थी, शिक्षक उपस्थित होते. दोन सत्रांत या स्पर्धा घेण्यात आल्या. (वार्ताहर)