सायबर क्राइममुळे सहकार क्षेत्र हतबल -विश्वास ठाकूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:24 IST2021-05-05T04:24:55+5:302021-05-05T04:24:55+5:30

नाशिक वसंत व्याख्यानमालेत मंगळवारी (दि.४) आ. डॉ. वसंत पवार स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित ‘सहकार- काल, आज आणि उद्या’ या विषयावर ठाकूर ...

Co-operative sector weakened due to cyber crime - Vishwas Thakur | सायबर क्राइममुळे सहकार क्षेत्र हतबल -विश्वास ठाकूर

सायबर क्राइममुळे सहकार क्षेत्र हतबल -विश्वास ठाकूर

नाशिक वसंत व्याख्यानमालेत मंगळवारी (दि.४) आ. डॉ. वसंत पवार स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित ‘सहकार- काल, आज आणि उद्या’ या विषयावर ठाकूर यांनी चौथे पुष्प ऑनलाइन पद्धतीने गुंफले.

याप्रसंगी ठाकूर यांनी ब्रिटिश काळातील सावकारी पद्धत, त्यात शेतकरी, सर्वसामान्यांची झालेली आर्थिक, मानसिक लूट, याचा आढावा घेतला. जमीन सुधारणा कायदा आणि शेतकऱ्यांच्या कर्जाचा कायदा १८८४ मध्ये मंजूर करण्यात आला आणि गुजरातच्या वडोदरा इथे पहिली सहकारी बँक सुरू झाली. आजही ही बँक अनन्य सहकारी मंडळी म्हणून कार्यरत आहे. शतकाची परंपरा असलेल्या सहकारातूनच पुढील राजकारणी तयार झाले. विखे, थोरात, शरद पवार, विलासराव देशमुख, राजारामबापू पाटील, गोपीनाथ मुंडे हे त्यापैकीच नेते असून, त्यांच्यामुळेच राजकारणाची पहिली पायरी सहकार क्षेत्र मानले जात असल्याचे ठाकूर यांनी यावेळी सांगितले.

नागरी सहकारी बँका आणि राष्ट्रीय बँका यात मोठी तफावत असून, रिझर्व्ह बँक सहकारामागे उभी राहत नसल्याची खंत ठाकूर यांनी व्यक्त केली. अशा परिस्थितीत नागरी बँका सक्षमतेने काम करीत आहेत. फक्त लोकांचा सहभाग वाढला पाहिजे. सहकार चळवळ वाढली, तर महाराष्ट्राची प्रगती कैक पटीने होईल, असा आशावाद ठाकूर यांनी व्यक्त केला.

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून गोदावरी बँकेच्या चेअरमन अमृता पवार उपस्थित होत्या. अध्यक्ष श्रीकांत बेणी यांनी प्रास्ताविक केले, तर चिटणीस संगीता बाफना यांनी आभार मानले.

छायाचित्र आर फोटावर ०४ विश्वास ठाकूर नावाने

===Photopath===

040521\04nsk_43_04052021_13.jpg

===Caption===

विश्वास ठाकूर

Web Title: Co-operative sector weakened due to cyber crime - Vishwas Thakur