शहरं
Join us  
Trending Stories
1
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
2
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
3
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
4
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
5
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
6
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
7
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
8
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
9
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
10
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
11
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
12
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!
13
Iran Sejjil Missile: इराणची सेजिल मिसाईल किती विध्वंस करू शकते, का होतेय इतकी चर्चा?
14
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
15
एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द
16
ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं
17
"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी
18
मोठी बातमी...! "इराणचा अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित, इस्रायलनं दिला मोठा शब्द; रशियाचा दावा
19
कोण आहेत इराणचे नवे इंटेलिजेंस चीफ जनरल माजिद खादेमी? जाणून घ्या त्यांच्याबद्दल..
20
भाजपा नगरसेवकांनी पक्षाविरोधातच पुकारलं बंड; नगराध्यक्षाविरोधातच आणला अविश्वास ठराव

Eknath Shinde : "आमचे आई-बाप का काढता? मलाही भूकंप करावा लागेल"; मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2022 15:14 IST

Eknath Shinde Slams Shivsena Uddhav Thackeray : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shivsena Uddhav Thackeray) आणि आदित्य ठाकरेंवर (Aaditya Thackeray) निशाणा साधला आहे. "तुम्ही आमचे आई-बाप का काढता? असा सवाल करत ठाकरे पिता-पुत्रांवर शिंदेंनी टीकास्त्र सोडलं आहे. तसेच "सत्तेसाठी विश्वासघात कोणी केला?, मलाही भूकंप करावा लागेल. जिथे अन्याय होईल, तेथे पेटून उठा, हे बाळासाहेबांनी आम्हाला सांगितलं" असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. 

"हातावर पोट भरणाऱ्यांच्या जीवनात बदल झाला पाहिजे, त्यांच्या आयुष्यात बदल झाला पाहिजे. या राज्याला विकासनिधी कमी पडू देणार नाही, रिक्षावाले, फेरीवाल्यांसाठी लवकरच महामंडळ. कमी कालावधीत राज्याच्या विकासाचे अनेक निर्णय घेतले" असं देखील मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. मालेगावमध्ये एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पोलीस वसाहतीचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव घेताना एकनाथ शिंदे यांच्या तोंडी चुकून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांचेच नाव आले. मात्र नंतर त्यांनी आपली चूक सुधारली. यामुळे उपस्थितांमध्ये हशा पिकला. मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांचा हा पहिलाच महाराष्ट्र दौरा आहे.

देशाचे पंतप्रधान देवेंद्र फडणवीस... शिंदेंच्या तोंडी आपसूक नाव आले आणि...

पोलीस वसाहतीचे उद्घाटन माझ्या हस्ते होणार हा योग होता. पोलीस बांधव हे सण उत्सव, कोविड, ऊन वारा पाऊस असतानाही जनतेचं रक्षण करतात. कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्याची जबाबदारी पोलीस पार पाडत आहेत. मनुष्यबळ, यंत्रणा हे देण्याचे काम शासनाचे आहे. पोलिसांसमोर अनेक अडचणी आहेत. जुन्या वसाहती आहेत, लिकेज आहेत, प्लॅस्टर्स पडत आहेत. राज्यभरात मोठ्या प्रमाणात घरांची निर्मिती करणार, अशी घोषणा एकनाथ शिंदे यांनी केली. 

जुन्या वसाहतींमध्ये आमूलाग्र बदल घडविण्याची गरज आहे. पोलीस रस्त्यावर असताना घराची चिंता नसावी, तर ते अधिक कार्यक्षमताने काम करु शकतील, अतिशय उत्तम काम आता लोकार्पण केलेल्या इमारतीचे आहे. सर्व खात्यांना एकत्र आणून, गृहनिर्माण सोसायटी तयार करणार. उपमुख्यमंत्री आणि इतर अधिकाऱ्यांशी यासंदर्भात बोलणे झाले, मुख्यमंत्र्यांचा प्रोटोकॉल कमी करा, असे डीजीना सांगितले, त्यामुळे जनतेला त्रास नको, असेही शिंदे म्हणाले. शिवसेना भाजप युतीचे सरकार आले. शेतकऱ्यांसाठी दिलासा देतोय, पेट्रोल डिझेल दर कमी केले, समुद्राला जाणारे पाणी दुष्काळी भागात वळवीत आहोत, आमचा पर्सनल अजेंडा काही नाही, असं शिंदेंनी स्पष्ट केलं.  

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाAditya Thackreyआदित्य ठाकरेMalegaonमालेगांव