कळवणला प्रारूप मतदार याद्यांमध्ये गोंधळ

By Admin | Updated: September 15, 2015 23:01 IST2015-09-15T23:00:22+5:302015-09-15T23:01:23+5:30

नगरपंचायत : अनेकांचे प्रभाग बदलल्याने डोकेदुखी वाढली

Cluttering format confusion in voter lists | कळवणला प्रारूप मतदार याद्यांमध्ये गोंधळ

कळवणला प्रारूप मतदार याद्यांमध्ये गोंधळ

कळवण : कळवण नगरपंचायतच्या प्रारूप मतदार याद्यामध्ये प्रचंड गोंधळ असून मतदारांच्या नावामध्ये प्रचंड बदल झाले असून अनेकांचे प्रभाग बदलून टाकण्याची किमया मतदार याद्यांनी केल्याने इच्छुक उमेदवार व समर्थक यांची डोकेदुखी वाढली आहे त्यामुळे कळवण नगरपंचायतच्या प्रभाग निहाय मतदार यादी सुधारणा कार्यक्र म राबविण्यात यावा अशी मागणी मतदारांनी केली आहे
अनेक वर्षापासून बदलून गेलेल्या मतदारांची नावे प्रारु प मतदार यादीत समाविष्ट करण्यात आल्याने मतदार यादींचा सावळागोंधळ समोर आला आहे
कळवण नगरपंचायतच्या 17 प्रभागामधील प्रारु प मतदार यादी सोमवारी प्रसिद्ध झाल्यानंतर या मतदार यादीमधील सावळागोंधळाला तोंड फुटले असून अनेकांनी या मतदार याद्यावर शंका उपस्थित केली आहे , मतदार यादीमध्ये दुबार नावे कमी करण्याचा कार्यक्र म निवडणूक आयोगाने राबविलेला असताना पुन्हा या याद्यामध्ये दुबार नावे आली कशी याबाबत शंका उपस्थित केली जात आहे.
कळवण नगरपंचायत प्रभाग रचनेनुसार मतदार याद्या नसून अनेक मतदारांची नावे वगळण्यात येऊन त्यांचा मतदार म्हणून असलेल्या हक्कावर गदा आणण्याचे काम निवडणूक शाखेने केले आहे, अनेक प्रभागात समाविष्ट असलेल्या भागातील व परिसरातील मतदार शेजारच्या प्रभागाला जोडून मतदारांची तोडफोड प्रारु प मतदार यादीत झाली असल्याने या प्रारु प मतदार याद्या उमेदवारांच्या व मतदारांच्या हक्कावर गंडातर आणणार्?या असल्याचा आरोप मतदारांनी केला आहे
कळवण नगरपंचायत प्रभाग रचनेत ज्या प्रभागात अनुसूचित जाती व जमाती मतदार जास्त आहेत ते प्रभाग आरिक्षत करणे गरजेचे असतांना देखील पहील्या आरक्षणानंतर सावळागोंधळ झाला होता त्यानंतर कळवण नगरपंचायतच्या 17 प्रभागामधील फेरआरक्षण काढण्याची नामुष्की यंत्रणेवर ओढावली होती ,तोच कित्ता प्रारु प मतदार यादी प्रकाशित करतांना प्रशासन यंत्रणेने गिरवला असून या प्रारु प मतदार याद्या चुकीच्या आण िअन्यायकारक असल्याने मतदारांना मतदानापासून वंचित ठेवण्याचा प्रकार असल्याने कळवण नगरपंचायतच्या 17 प्रभागामधील मतदार यादी दुरु स्ती कार्यक्र म प्रशासन व निवडणूक आयोगाने हाती घ्यावा , त्यानंतर निवडणूक कार्यक्र म हाती घ्यावा अशी मागणी मतदारांनी केली आहे
कळवण नगरपंचायतची 17 प्रभागांची रचना प्रारु प मतदार यादी प्रकाशित झाल्यानंतर समजली असून प्रारु प प्रभाग रचना आण िप्रारु प मतदार यादीनुसार असलेली रचना आण िसमाविष्ट करण्यात आलेले मतदार यामुळे इच्छुक उमेदवार व समर्थक चक्र ावून गेले आहेत.

Web Title: Cluttering format confusion in voter lists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.