सार्वजनिक ठिकाणी हाणामारी
By Admin | Updated: September 14, 2015 23:00 IST2015-09-14T23:00:16+5:302015-09-14T23:00:42+5:30
सार्वजनिक ठिकाणी हाणामारी

सार्वजनिक ठिकाणी हाणामारी
मालेगाव : शहरातील छावणी पोलीस ठाण्यासमोर सार्वजनिक ठिकाणी हाणामारी केल्याप्रकरणी चौघांविरुद्ध छावणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलीस कर्मचारी कुमावत यांनी फिर्याद दिली. रविवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास हाणामारीचा प्रकार घडला. या प्रकरणी पोलिसांनी प्रकाश ठलकिया, संतोष ठलकिया, आकाश ठलकिया व प्रवीण ठलकिया यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास जमादार फोडसे करीत आहेत.(प्रतिनिधी)