कोेटमगावी आदिवासींना वस्त्रांचे वाटप

By Admin | Updated: November 10, 2015 22:31 IST2015-11-10T22:30:33+5:302015-11-10T22:31:39+5:30

कोेटमगावी आदिवासींना वस्त्रांचे वाटप

Clothing Allocation to Kottamgavi Adivasi | कोेटमगावी आदिवासींना वस्त्रांचे वाटप

कोेटमगावी आदिवासींना वस्त्रांचे वाटप

येवला : नेहरू युवा केंद्र व धडपड मंच या सेवाभावी संस्थेतर्फे दीपोत्सवयेवला : खटपट युवा मंच आणि नेहरू युवा केंद्र यांच्या वतीने येवला तालुक्यातील कोटमगाव येथील आदिवासी वस्तीवर येथे एक वस्र मोलाचे व फराळाचे वाटप हा उपक्र म राबवण्यात आला. खटपट मंचच्या कार्यकर्त्यांनी सामाजिक बांधिलकी व सेवाव्रताचे भान ठेवीत हा उपक्रम राबवला. या वस्तीवरील सर्व
कुटुंबांनी दिवाळी साजरी केल्याचा आनंद घेतला. नवीन कपडे आणि फराळ येथील कुटुंबीयांना देण्यात आला.
प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही येथील खटपट मंच या सेवाभावी संस्थेच्या वतीने दीपावली सणानिमित्त एक वस्र मोलाचे हा अभिनव उपक्र म राबविला. तालुक्यातील कोटमगाव शिवारात राहणाऱ्या आदिवासी कष्टकरी बांधव, महिला, भगिनी, मुलामुलींना या वस्राचे व फराळाचे वाटप केले जाते. खटपट युवा मंचचे सेवाभावी कार्यकर्ते व मंचचे अध्यक्ष आयोजक मुकेश लचके, कार्यवाह दत्तात्रेय नागडेकर व इतर युवक शहरातील व्यापारी, दुकानदार यांच्याकडून कपडे गोळा करतात. येथील शिंपी गल्लीतील मंचच्या कार्यालयात जमा केले जातात. या कामी समाजसेवी नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले होते. ज्या आदिवासी बांधवांच्या घरी दिवाळीच्या दिवसात महागाईच्या जमान्यात नवीन कपडे घेण्याचीदेखील परिस्थिती नसते. अशा बांधवांसाठी हा एक वस्र मोलाचा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला आहे.
जनकल्याण समितीचे नारायण शिंदे, सचिन देव्हाडराय, दिगंबर कुलकर्णी, संतोष खंदारे, मंगेश राहणे, राजेंद्र कल्याणकर, अमोल लगड, धनंजय लचके, श्रीकांत खंदारे, अमित गणोरे, मंथन कल्याणकर, दिव्यांनी कल्याणकर, संस्कृतिकार प्रभाकर झळके यांनी या मोलाच्या वस्राचे व फराळाचे वाटप केले. कोटमगावस्थित मंगेश माळी, सुनीता सोनवणे, चंद्रकला पवार, माधव जाधव, चंद्रभागा माळी, शकुंतला निकम, कचरू माळी, भीमा गायकवाड, गुलाब सोनवणे, कुसुम गायकवाड, संजय बर्डे, दगूबाई माळी, लीलाबाई माळी, सुनीता गायकवाड, संतोष माळी यांच्यासह ग्रामस्थांनी या
उपक्र माबद्दल मंचला धन्यवाद दिले. (वार्ताहर)

Web Title: Clothing Allocation to Kottamgavi Adivasi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.