देवळा तालुक्यातील ३० सहकारी संस्था बंद
By Admin | Updated: December 24, 2015 22:17 IST2015-12-24T21:59:11+5:302015-12-24T22:17:25+5:30
देवळा तालुक्यातील ३० सहकारी संस्था बंद

देवळा तालुक्यातील ३० सहकारी संस्था बंद
देवळा : तालुक्यातील १८४ सहकारी संस्थांचे सहकार विभागातर्फे दि. ३० सप्टेंबर अखेर सर्वेक्षण पूर्ण झाले असून तालुक्यातील दोन संस्थांचा पत्ताच नसल्याची बाब उघडकीस आली आहे.
तालुक्यात ३० संस्था या बंद असल्याची माहिती प्रभारी सहायक निबंधक देशमुख यांनी दिली. तालुक्यातील सहकारी संस्थांचे सर्वेक्षण सहकार विभागाने पूर्ण केले आहे. यासाठी लेखा परीक्षकांची नेमणूक करण्यात येऊन प्रत्येक लेखा परीक्षकाकडे ठरावीक सहकारी संस्थांचे सर्वेक्षण करण्याची जबाबदारी होती. त्यात राहुल विटखडी उत्पादक सहकारी संस्था, सुभाषनगर, ता. देवळा व आशापुरी सहकारी संस्था, देवळा या दोन संस्थाचा ठावठिकाणा लागत नाही व ३० संस्था या बंद अवस्थेत आहेत. बंद व कार्यस्थगित संस्थांचे अवसायानाबाबत अंतिम आदेश काढण्यात आल्याची माहिती देवळ्याच्या सहायक निबंधकांनी दिले आहे. (वार्ताहर)