शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

सरकारच्या नॅशनल मेडीकल कमीशनच्या निषेधार्थ नाशिकमध्ये वैद्यकिय व्यवसायिकांचा उद्या बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2018 4:31 PM

देशभरातील वैद्यकिय व्यावसायिक मंगळवारी (दि. २) सकाळी सहा ते सायंकाळी सहा असा बारा तासांचा बंद पाळणार आहेत.

ठळक मुद्देसकाळी सहा ते सायंकाळी सहा असा बारा तासांचा बंद अत्यावश्यक रूग्णसेवा सुरू असतील

नाशिक-  केंद्र सरकारच्या नॅशनल मेडीकल कमीशन बील मधील जाचक बदलांच्या निषेधार्थ देशभरातील वैद्यकिय व्यावसायिक मंगळवारी (दि. २) सकाळी सहा ते सायंकाळी सहा असा बारा तासांचा बंद पाळणार आहेत. त्यामुळे रूग्ण सेवेवर प्रतिकुल परिणाम होण्याची शक्यता आहे. अर्थात, अत्यावश्यक रूग्णसेवा सुरू असतील असे आयएमएच्या नाशिक शाखेने स्पष्ट केले आहे.केंद्र सरकारच्या वतीने नॅशनल मेडीकल कमीशन बील अंतर्गत मध्ये मोठे फेरबदल करण्यात येणार आहेत. त्यात डॉक्टरांचे प्रतिनिधी घटविण्यात येणार असून त्याऐवजी शासन नियुक्त प्रतिनिधी वाढविण्यात येणार आहेत. त्यामुळे सरकारच्या ध्येय धोरणांना अनुकूल असे व्यक्त नियुक्त करून सरकारची चुकीची धोरणेही पुढे रेटण्याचा प्रयत्न केला जाण्याची शक्यता आहे. त्याच प्रमाणे वैद्यकिय महाविद्यालयांना देखील मान्यता देताना चुकीचे पायंडे पडण्याची शक्यता आहे. याशिवाय नीट सारख्या सामाईक प्रवेश परीक्षेतही मोठे फेरबदल होणार आहेत. त्यामुळे वैद्यकिय व्यावसायिकच नव्हे तर विद्यार्थ्यांना देखील त्रास सहन करावा लागेल. सदरचे विधेयक संसदेत मंगळवारी (दि.२) मांडण्यात येणार असून या लोकशाही विरोधी प्रस्तावाला विरोध करण्यासाठी इंडीयन मेडीकल असोसिएशनने एक दिवसाचा लाक्षणिक बंद पुकारला आहे. या दरम्यान, निवेदन देऊन आणि आंदोलने करण्यात येणार असल्याचे आयएमए नाशिकचे अध्यक्ष डॉ. मंगेश थेटे यांनी सांगितले. वैद्यकिय व्यवसायिकांच्या वतीने या प्रस्तावित बदलांच्या विधेयकाला विरोध करणाºया विधेयकाला विरोध करावा यासाठी खासदार हेमंत गोडसे यांना सोमवारी (दि.१) निवेदन देण्यात आला...ओपीडी बंद राहणारआयएमएच्या आवाहनानुसार बाह्य रूग्ण विभाग बंद ठेवण्यात येणार असून शस्त्रक्रिया देखील केल्या जाणार नाहीत. अर्थात, खुपच आवश्यक असेल अशा प्रकारची सर्व कामे आणि शस्त्रक्रिया केल्या जातील.- डॉ. मंगेश थेटे, नाशिक

 

टॅग्स :hospitalहॉस्पिटलStrikeसंपGovernmentसरकार