व्यसनमुक्ती सप्ताहाचा समारोप

By Admin | Updated: October 9, 2014 01:12 IST2014-10-09T00:52:24+5:302014-10-09T01:12:15+5:30

व्यसनमुक्ती सप्ताहाचा समारोप

Closing the Addiction Week | व्यसनमुक्ती सप्ताहाचा समारोप

व्यसनमुक्ती सप्ताहाचा समारोप


पंचवटी : नवीन आडगाव नाक्यावरील श्री स्वामिनारायण नर्सिंग संस्थेत गांधी जयंतीनिमित्त राबविण्यात आलेल्या व्यसनमुक्ती सप्ताहाचा समारोप करण्यात आला.
मानस व्यसनमुक्ती केंद्र, रोटरी क्लब आॅफ नाशिक मिडल आणि डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने व्यसनमुक्ती सप्ताह झाला. यामध्ये व्यसनमुक्ती संदेश यात्रा, औद्योगिक कामगारांसाठी व्यसनमुक्ती कार्यक्रम, व्यसनमुक्ती क्षेत्रातील महिलांचा सहभाग, स्थलांतरित कामगारांची व्यसनमुक्ती, पथनाट्य आदि उपक्रम राबविण्यात आले.
सप्ताहाच्या समारोपानिमित्ताने डॉ. महेश भिरुड यांचे ‘व्यसनमुक्ती : एक सामाजिक चळवळ’ या विषयावर व्याख्यान झाले. याप्रसंगी मनोज काळे, अशोक काळे, अजय कुलकर्णी यांचा व्यसनमुक्त झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला चेतन भगत, सरिता नारंग, डॉ. चंद्रशेखर नामपूरकर आदिंसह नर्सिंग संस्थेचे विद्यार्थी उपस्थित होते. तारा पोटे यांनी प्रास्ताविक, तर नामपूरकर यांनी सूत्रसंचालन केले. वैदेही श्रिसाठ यांनी आभार मानले. (वार्ताहर)

Web Title: Closing the Addiction Week