खून प्रकरणी एकास कोठडी
By Admin | Updated: May 16, 2015 23:35 IST2015-05-16T23:35:41+5:302015-05-16T23:35:59+5:30
खून प्रकरणी एकास कोठडी

खून प्रकरणी एकास कोठडी
वणी : बहिणीची छेड काढतो याचा राग मनात धरून वीसवर्षीय युवकाचा धारदार शस्त्राने खून करणाऱ्या संशयितास पोलिसांनी अटक केल्यानंतर न्यायालयाने त्यास पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. दिंडोरी तालुक्यातील लखमापूर येथील अमोल बापू मोरे (२०) हा युवतीची छेड काढत होता. त्याला समज देऊनही त्याच्या वर्तनात बदल झाला नाही.
शुक्र वारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास लखमापूर येथील कोळीवाडा परिसरात अमोल बापू मोरे व हिरामन दामू धुळे या दोघांमध्ये शाद्बिक चकमक झाली. प्रकरण मुद्यावरून गुद्यावर आले संतापाच्या भरात हिरामन धुळे याने कुऱ्हाडीने अमोल याच्या मानेवर वार केला. त्यात त्याचा मृत्यू ओढवला. पोलीस उपअधिक्षक सचिन गुंजाळ पोलीस निरीक्षक मिलिंद खोडवे, किरण बैरागी व पोलीस पथकाने हिरामन धुळे याला ताब्यात घेतले. हिरामन धुळेवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास न्यायालयाने दि. २२ मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. (वार्ताहर)
सोनारी येथील विवाहितेचा जळून मृत्यू
सिन्नर : तालुक्यातील सोनारी येथील विवाहिता भाजल्याने तिच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना तिचा सकाळी पावणेआठ वाजेच्या सुमारास मृत्यू झाला. सुनीता नानाजी भावले (३५) ही विवाहिता सोनारी येथील राहत्या घरी शुक्रवारी रात्री भाजल्याने तिला उपचारासाठी नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शनिवारी सकाळी तिचा मृत्यू झाला.
याप्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. (वार्ताहर)