अंबड खुनातील संशयिताला कोठडी
By Admin | Updated: July 23, 2014 00:31 IST2014-07-22T22:10:27+5:302014-07-23T00:31:38+5:30
अंबड खुनातील संशयिताला कोठडी

अंबड खुनातील संशयिताला कोठडी
नाशिक : जुन्या भांडणाची कुरापत काढून चुंचाळे शिवारात रविवारी सायंकाळी झालेल्या युवकाच्या खुनातील दोघा संशयितांना न्यायालयाने गुरुवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली, तर दोन अल्पवयीन मुलांची रिमांड होमला रवानगी केली़ याबाबत अंबड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वरचे चुंचाळे परिसरातील रामलीला रो-हाऊसमध्ये राहणारा रोहित बाबूराव यादव (१९) याचे संशयित छत्रपती विशाल केदारे, गणेश छत्रपती केदारे व या कुटुंबातील दोन अल्पवयीन मुलांसोबत १७ जुलैला भांडण झाले होते़ या भांडणाची कुरापत काढून रविवारी सायंकाळी केदार कुटुंबातील चौघांनी
रोहित यादवला मारहाण केली़ या मारहाणीत यादव गंभीर जखमी झाल्याने मृत्यू झाला़ या प्रकरणी मयत रोहितचा भाऊ विजय यादव याने फि र्याद दिली. (प्रतिनिधी)