लोहणेरला बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2020 15:55 IST2020-03-22T15:54:47+5:302020-03-22T15:55:35+5:30

लोहोणेर : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या जनता कर्फ्यूच्या आवाहनाला लोहोणेरसह विठेवाडी व बागलाण तालुक्यातील ठेंगोडा येथे नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

 Closed to Lohaner | लोहणेरला बंद

लोहणेरला बंद

ठळक मुद्दे व्यापाऱ्यांनी सायंकाळपर्यंत दुकाने बंद ठेवण्यात आली. यामुळे रस्त्यावर सर्वत्र शुकशुकाट बघायला मिळाला. देवळा पोलीस ठाण्याच्या वतीने लोहोणेर गावातून दक्षता फेरी काढण्यात आली.

लोहोणेर गावातील सर्वच व्यवहार यावेळी बंद करण्यात आले होते. लोहोणेर गावात दिवसभर सर्वत्र शुकशुकाट जाणवत होता. तर विठेवाडी येथेही कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून सकाळपासूनच सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली होती. ठेंगोडा येथील सर्व दुकाने बंदमध्ये सामील झाली होती.

 :

Web Title:  Closed to Lohaner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.