इंदिरानगरला दोन ठिकाणी मतदान यंत्रे बंद
By Admin | Updated: October 16, 2014 19:00 IST2014-10-16T00:22:46+5:302014-10-16T19:00:27+5:30
इंदिरानगरला दोन ठिकाणी मतदान यंत्रे बंद

इंदिरानगरला दोन ठिकाणी मतदान यंत्रे बंद
इंदिरानगर : सुखदेव शाळा व जाजू विद्यालय येथे काही काळ मशीन बंद पडल्याने तातडीने मशीन बदलण्यात आले. तसेच परिसरात मतदान शांततेत पार पडले.
मध्य नाशिक मतदारसंघासाठी परिसरात स्वामी विवेकानंद प्राथमिक विद्यालय, सुखदेव शाळा, मोदकेश्वर सभागृह, स्नेहवर्धिनी महिला मंडळ सभागृह, विवेकानंद सभागृह, तर पश्चिम मतदारसंघासाठी डे केअर शाळा, जाजू विद्यालय, सेंट फ्रान्सिस हायस्कूल येथे मतदान केंद्रे होती. सकाळपासून मतदारांचा उत्साह दिसून येत होता. जाजू विद्यालयात दोन वेळेस मशीन बंद पडल्याने १0 ते १५ मिनिटांत मशीन बदलण्यात आले. सुखदेव शाळेतही मशीन बंद पडल्याने ते तातडीने बदलण्यात आले. डे केअर शाळेलगत आणि जाजू विद्यालयालगत बूथवरील पक्षाचे बॅनर्स व चिठ्ठ्या पोलिसांनी जप्त केला. (प्रतिनिधी)