बंद घरांची होणार तपासणी

By Admin | Updated: September 30, 2016 02:19 IST2016-09-30T02:18:38+5:302016-09-30T02:19:36+5:30

आॅपरेशन डेंग्यू : आजपासून प्रभागनिहाय विशेष मोहीम

Close home inspection | बंद घरांची होणार तपासणी

बंद घरांची होणार तपासणी

नाशिक : गेल्या दोन महिन्यांत डेंग्यू आजाराच्या रुग्णसंख्येत वाढ होऊ लागल्याने महापालिकेची आरोग्य यंत्रणाही आता हादरली असून, डेंग्यूला रोखण्यासाठी शुक्रवार (दि.३०) पासून प्रभागनिहाय विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. प्रामुख्याने अनेक महिने, वर्षांपासून बंद स्थितीत असलेल्या घरांचीही तपासणी केली जाणार आहे. याशिवाय, आरोग्यरथाच्या माध्यमातून नागरिकांचे प्रबोधनही केले जाणार आहे.शहरात आॅगस्ट महिन्यात १८७ तर सप्टेंबरमध्ये १६२ रुग्णांना डेंग्यूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या दोन महिन्यांत डेंग्यूच्या रुग्णसंख्येत भर पडल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर महापौर अशोक मुर्तडक यांनी बुधवारी आरोग्य विभागाची बैठक बोलावून तातडीने प्रभावी उपाययोजनेचे आदेश दिले होते. त्यानुसार, आरोग्य विभागाने विशेष कृती कार्यक्रम तयार केला असून, दि. ३० सप्टेंबर ते १५ आॅक्टोबर २०१६ या कालावधीत प्रभागनिहाय मोहीम राबविली जाणार आहे.

Web Title: Close home inspection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.