गडावरील बोकडबळी प्रथा बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2017 00:28 IST2017-09-17T00:28:13+5:302017-09-17T00:28:47+5:30
श्री सप्तशृंग गडावर देवस्थान ट्रस्टतर्फे सुरू असलेली बोकडबळीची प्रथा या वर्षापासून बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

गडावरील बोकडबळी प्रथा बंद
कळवण : श्री सप्तशृंग गडावर देवस्थान ट्रस्टतर्फे सुरू असलेली बोकडबळीची प्रथा या वर्षापासून बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
आगामी नवरात्रोत्सवाची नियोजन बैठक कळवणचे प्रांताधिकारी अर्जुन श्रीनिवासन यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी पार पडली. या बैठकीला सर्व शासकीय विभागाचे प्रमुख, देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी, गड व नांदुरी ग्रामपंचायतीचे पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत वरील निर्णय घेण्यात आला. गतवर्षी बोकडबळीच्या वेळी हवेत गोळीबार झाल्याने १२ जण जखमी झाले होते. भाविकांच्या जिवाला धोका असणारी ही प्रथा बंद करण्यात यावी, असं आवाहन करण्यात आल्याचे तहसीलदार कैलास चावडे यांनी सांगितले. यावेळी गटविकास अधिकारी बहिरम, देवस्थान विश्वस्त डॉ. रावसाहेब शिंदे, कार्यकारी अधिकारी भगवान नेरकर, सप्तंशृगगडाच्या सरपंच श्रीमती सुमन सूर्यवंशी, ग्रामपंचायत सदस्य गिरीश गवळी, नांदुरीचे भाऊ कानडे, अभोण्याचे निरीक्षक राहुल फुला, वन अधिकारी बशीर शेख, ग्रामसेवक आर.बी. जाधव, सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंता किशोर केदार आदि बैठकीस उपस्थित होते.