सातपूरच्या प्रस्तावित पोस्ट ऑफिस इमारतीचा मार्ग मोकळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:17 IST2021-06-09T04:17:48+5:302021-06-09T04:17:48+5:30
सातपूर : गेल्या ३५ वर्षांपासून सातपूर कॉलनीतील प्रस्तावित पोस्ट ऑफिस इमारत उभारणीचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे रखडला होता. याबाबत खासदार ...

सातपूरच्या प्रस्तावित पोस्ट ऑफिस इमारतीचा मार्ग मोकळा
सातपूर : गेल्या ३५ वर्षांपासून सातपूर कॉलनीतील प्रस्तावित पोस्ट ऑफिस इमारत उभारणीचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे रखडला होता. याबाबत खासदार हेमंत गोडसे यांनी पुढाकार घेऊन हा प्रश्न मार्गी लावला आहे. महिन्याभरात प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात होणार असल्याने सातपूरकरांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे. सातपूर कॉलनीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्केटलगत गेल्या ३५ वर्षांपासून पोस्ट कार्यालयासाठी भूखंड पडून आहे. पोस्ट विभागाने म्हाडाकडून ही जागा घेतली होती. या जागेवर पोस्ट कार्यालय उभारण्यात यावे म्हणून गेल्या २५ वर्षांपासून सतत पाठपुरावा सुरू होता. हा प्रश्न केंद्र सरकारच्या अखत्यारित येत असल्याने मागील पंचवार्षिक काळात नगरसेवक सलीम शेख यांनी खासदार हेमंत गोडसे यांच्याशी संपर्क साधून पोस्ट कार्यालय उभारणीसाठी प्रयत्न करण्याची गळ घातली होती. त्यानुसार खासदार गोडसे यांनी दि. ७ जुलै २०१४ रोजी प्रत्यक्ष जागेवर येऊन पाहणी केली होती. व हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते. प्रस्तावित भूखंडावर पोस्ट कार्यालयाची इमारत बांधण्यासाठी म्हाडा आणि नाशिक महानगरपालिकेच्या विभागाकडून ना हरकत दाखला आवश्यक होता. मात्र या विभागांकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळत नसल्यामुळे पोस्ट ऑफिस इमारत उभारणीचा प्रस्ताव शासन दरबारी प्रलंबित होता. खासदार गोडसे यांनी स्वतः प्रयत्न करून म्हाडा व महानगरपालिकेकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळवून दिल्याने पोस्ट कार्यालय उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे. लवकरच सरकारकडून इमारत उभारणीसाठी निधी उपलब्ध होणार आहे. सदर बांधकामाची वर्क ऑर्डर निघाली असून, येत्या महिनाभरात प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे येत्या काळात सातपूर विभागात डाक विभागाचे स्वतंत्र कार्यालय कार्यान्वित होणार असल्याची माहिती खासदार गोडसे यांनी दिली.
इन्फो : सातपूर येथे सुसज्ज अशी पोस्ट कार्यालयाची इमारत उभी राहणार आहे. या कार्यालयात नागरिकांना पोस्टाच्या सर्व योजनांचा लाभ मिळणार आहे. तसेच आधुनिक सोयीसुविधा पुरविल्या जाणार आहेत. या स्वतंत्र कार्यालयात साधारण १५ ते २० अधिकारी, कर्मचारी यांची संख्या असणार आहे. त्यामुळे या भागातील ग्राहकांमध्ये आणि नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे.
☰
Template
Image Attachment
Photo Manager
Social Media
Metadata
Attach Document
Translate
Backup
Agency
QrCode
Attch Audio/Video
Words : 1
Characters : 0