द्वारकावरील भुयारी पादचारी मार्गाची सफाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2018 00:28 IST2018-05-13T00:28:31+5:302018-05-13T00:28:31+5:30
द्वारका चौकातील भुयारी पादचारी मार्ग वापरण्यायोग्य होण्यासाठी महापालिकेमार्फत शनिवारी मार्गाची साफसफाई करण्यात येऊन आतील विद्युत व्यवस्थेची दुरुस्ती करण्यात आली.

द्वारकावरील भुयारी पादचारी मार्गाची सफाई
नाशिक : द्वारका चौकातील भुयारी पादचारी मार्ग वापरण्यायोग्य होण्यासाठी महापालिकेमार्फत शनिवारी मार्गाची साफसफाई करण्यात येऊन आतील विद्युत व्यवस्थेची दुरुस्ती करण्यात आली. शुक्रवारी (दि.११) महापालिकेत अर्बन मोबालिटी सेलच्या बैठकीत आयुक्त तुकाराम मुंढे यांनी द्वारका चौफुलीवरील भुयारी पादचारी मार्ग वापरायोग्य करण्यासंबंधीच्या सूचना दिल्या होत्या. सदर मार्गाची तातडीने स्वच्छता करणे तसेच आवश्यक त्या दुरुस्त्या करण्याचे आदेशित केले होते. त्यानुसार, शनिवारी (दि.१२) महापालिकेमार्फत भुयारी पादचारी मार्गाच्या साफसफाईचे काम हाती घेण्यात आले.