नासर्डी, गोदाघाटाची मनपाकडून साफसफाई

By Admin | Updated: August 26, 2016 23:36 IST2016-08-26T23:35:11+5:302016-08-26T23:36:05+5:30

घाटावर कचरा पडून : कचरा घंटागाड्यांमार्फत उचलून नेण्याची मागणी

Cleanliness by Nassardi, Godaghat Municipal Corporation | नासर्डी, गोदाघाटाची मनपाकडून साफसफाई

नासर्डी, गोदाघाटाची मनपाकडून साफसफाई

नाशिक : दि. २ आॅगस्टला गोदावरीसह नासर्डी नदीला आलेल्या महापुरामुळे नदीपात्र व घाटावर मोठ्या प्रमाणावर साचलेला घाण-कचरा हटविण्याची मोहीम मनपाने सुरू केली आहे. मात्र, काही भागात घंटागाड्या उपलब्ध करून न देण्यात आल्याने गोदाघाटावरील कचरा तसाच पडून आहे.
मनपाच्या वतीने शुक्रवारी पुन्हा एकदा मोहीम सुरू करण्यात आली. नासर्डी नदीपात्रातील उंटवाडी पुलाजवळील घाण-कचरा हटविण्यात आला तसेच आयटीआय पुलाखालील घाणही साफ करण्यात आली. याचबरोबर नाशिकरोड येथील दसक-पंचक येथे गोदावरी घाटावर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी घाटावरील रेलिंगला लटकलेला घाण-कचरा साफ करण्यात येऊन तो घंटागाडीमार्फत उचलण्यात आला.

Web Title: Cleanliness by Nassardi, Godaghat Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.