शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

नाशकात स्वच्छतेचा भार अवघ्या १७१२ कामगारांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 18:41 IST

महापालिका : समसमान वाटपानंतरही साफसफाईत अडचणी

ठळक मुद्देशहरातील पंचवटी, सिडकोसारख्या भागातील साफसफाई कामातील अडचणी सुटू शकलेल्या नाहीतशहराचा वाढता विस्तार पाहता सुमारे ३७०० सफाई कामगारांची निकड आहे. आउटसोर्सिंगने सफाई कामगारांची भरती करण्याचाही प्रश्न भिजत पडलेला आहे.

नाशिक : शहरातील १९०१ कि.मी. लांबीचे रस्ते झाडण्याचे काम अवघे १७१२ सफाई कामगार करीत आहेत. आरोग्य विभागाने विभागनिहाय सफाई कामगारांचे समसमान वाटप केले तरी, शहरातील पंचवटी, सिडकोसारख्या भागातील साफसफाई कामातील अडचणी सुटू शकलेल्या नाहीत. शहराचा वाढता विस्तार पाहता सुमारे ३७०० सफाई कामगारांची निकड आहे. आउटसोर्सिंगने सफाई कामगारांची भरती करण्याचाही प्रश्न भिजत पडलेला आहे.महापालिकेत यापूर्वी १४७४ कामगार प्रत्यक्ष साफसफाईची कामे करायची, तर उर्वरित ३८९ कामगार हे सोयीनुसार अन्य विभागात काम करायचे. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सूत्रे हाती घेतल्यानंतर सफाई कामगार असूनही अन्य विभागात काम करणाऱ्या या ३८९ कामगारांच्या हाती झाडू सोपविण्याचा निर्णय घेतला. परंतु, त्यातील २३८ कामगारच प्रत्यक्ष रस्त्यावर दिसू लागले, तर अद्यापही १५१ कामगार आहेत त्याच विभागात कार्यरत आहेत. नगरसेवकांच्या मागणीनुसार सफाई कामगारांचे विभागनिहाय समसमान वाटप करण्यात आले. त्यानुसार, सफाई कामगारांकडून कामेही करून घेतली जात आहेत. परंतु शहरातील १९०१ कि.मी.चे रस्ते झाडण्यासाठी १७१२ कामगारही अपुरे ठरू लागले आहेत. सिडकोत ४८३.६६ कि.मी., नाशिक पूर्व विभागात २६६.५० कि.मी., नाशिकरोड विभागात २५९.७८ कि.मी., पंचवटी विभागात ४०६.६६ कि.मी., नाशिक पश्चिम विभागात १६८.८१ कि.मी., तर सातपूर विभागात ३१५.५९ कि.मी. लांबीचे रस्ते आहेत. कामगारांच्या समसमान वाटपानंतरही शहर स्वच्छतेतील अडचणींचा डोंगर कायम आहे. प्रामुख्याने, पंचवटी व सिडको भागातील सफाई कामाबाबत मोठ्या प्रमाणावर तक्रारी आहेत. त्यातच आता पावसाळ्यात सफाई कामाबरोबरच तुंबलेल्या गटारीही साफ करण्याचे काम सफाई कामगारांना दिले जाण्याचे घाटत असल्याने सफाई कामगारांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाEmployeeकर्मचारी