महापालिकेत झाली साफसफाई

By Admin | Updated: October 3, 2014 01:41 IST2014-10-03T01:41:34+5:302014-10-03T01:41:34+5:30

महापालिकेतझाली साफसफाई

Cleanliness in Municipal Corporation | महापालिकेत झाली साफसफाई

महापालिकेत झाली साफसफाई

अकोला : विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात अकोला पश्‍चिम वगळता इतर चार मतदारसंघात उमेदवारांची संख्या पंधरापेक्षा जास्त आहे. त्यामुळे या चारही मतदारसंघांसाठी १ हजार २८ ह्यबॅलेट युनिटह्ण लागणार आहेत. त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकार्‍यांकडे (सीईओ) गुरुवारी बॅलेट युनिटची मागणी करण्यात आली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या जिल्ह्यातील पाच मतदारसंघातील उमेदवारांचे चित्र १ सप्टेंबर रोजी स्पष्ट झाले. त्यामध्ये अकोला पूर्व २५, अकोला पश्‍चिम १५, आकोट १८, बाळापूर १६ आणि मूर्तिजापूर मतदारसंघात १९ उमेदवार निवडणूक लढवित आहेत. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांद्वारे मतदान प्रक्रियेत मतदान यंत्रांच्या ह्यबॅलेट युनिटह्णवर एकूण १६ बटण असतात, त्यामध्ये १५ उमेदवारांच्या नावांसमोरील बटणांसह १६ व्या क्रमांकावर ह्यनोटाह्णचे बटण असते. त्यानुसार विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यासाठी उपलब्ध एकूण १ हजार ८३९ बॅलेट युनिटपैकी १ हजार ३६७ बॅलेट युनिट यापूर्वी जिल्हा प्रशासनामार्फत जिल्ह्यातील पाच मतदारसंघात वितरित करण्यात आले. उर्वरित ४७२ बॅलेट युनिट जिल्हा निवडणूक विभागाकडे आरक्षित आहेत; मात्र अकोला पश्‍चिम मतदारसंघ वगळता जिल्ह्यातील अकोला पूर्व, आकोट, बाळापूर व मूर्तिजापूर या चार म तदारसंघात उमेदवारांची संख्या १५ पेक्षा जास्त आहे. त्यामुळे या चारही मतदारसंघात मतदान प्रक्रियेत दुप्पट ह्यबॅलेट युनिटह्ण लागणार आहेत. त्यासाठी १ हजार २८ बॅलेट युनिट उपलब्ध करून देण्याची मागणी जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक विभागामार्फत गुरुवारी राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकार्‍यांकडे पत्राद्वारे करण्यात आली.

Web Title: Cleanliness in Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.