आरोग्य केंद्र व शाळांमध्ये राबविणार स्वच्छता अभियान
By Admin | Updated: November 8, 2014 00:34 IST2014-11-08T00:32:57+5:302014-11-08T00:34:33+5:30
आरोग्य केंद्र व शाळांमध्ये राबविणार स्वच्छता अभियान

आरोग्य केंद्र व शाळांमध्ये राबविणार स्वच्छता अभियान
नाशिक : शहर व जिल्'ात डेंग्यूसह अन्य साथरोगांचे वाढलेले प्रमाण पाहता जिल्हा परिषदेच्या सर्व १०३ प्राथमिक आरोग्य केंद्रांत व ५७७ उपकेंद्रांत तसेच ३३६६ प्राथमिक आरोग्य शाळांमध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण व आरोग्य सभापती किरण पंढरीनाथ थोरे यांनी दिली. या अभियानात शिक्षण व आरोग्य विभागातील सर्वच कर्मचारी व अधिकारी सहभागी होणार असून, जिल्हा परिषद गटात त्या-त्या जिल्हा परिषद सदस्यांच्या हस्ते या स्वच्छता अभियानाचा शुभारंभ करण्यात येणार असल्याचे सौ. थोरे यांनी सांगितले. जिल्हा परिषद प्रशासनाने स्वच्छ भारत अभियानांतर्गत प्रत्येक मंगळवारी एका ग्रामपंचायतीत स्वच्छता मोहीम आयोजित केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता महिन्यातील चार दिवस जिल्'ातील एकेका प्राथमिक आरोग्य केंद्रात, उपकेंद्रात तसेच जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत हे स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. या स्वच्छता अभियानात सर्वांनीच सहभागी व्हावे. आपला परिसर स्वच्छ असल्यास साथरोग पसरणार नाही तसेच वाढत्या डेंग्यूच्या प्रसारालाही आळा बसेल, असे सभापती किरण थोरे यांचे म्हणणे आहे. हे अभियान राबविण्यासंदर्भात जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा परिषदेचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी यांना सूचना देण्यात येणार आहेत. (प्रतिनिधी)