शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे शहरात स्वच्छता मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 12:21 AM

सामाजिक बांधिलकी जोपासण्याच्या उद्देशाने डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

नाशिक : सामाजिक बांधिलकी जोपासण्याच्या उद्देशाने डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.  या मोहिमेत सुमारे २६०० स्वयंसेवकांनी सहभाग घेऊन ५६ टन कचरा संकलित करून त्याची योग्य विल्हेवाट लावण्यात आली. दरम्यान, आरोग्य जनजागृतीसह विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. रेवदंडा येथील डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून समाजामध्ये स्वच्छता आणि आरोग्याबाबत जनजागृती व्हावी, या उद्देशाने शहरात सिडको, इंदिरानगर, पंचवटी, अशोकनगर, सातपूर, नाशिकरोड, त्र्यंबकरोड, गंगापूररोड, कॉलनीरोड आदी ठिकाणी परिसर स्वच्छता मोहीम राबविण्यात  आली.  पंचवटी परिसरात या मोहिमेचा शुभारंभ महापौर रंजना भानसी यांच्या हस्ते तर सिडको परिसरात आमदार सीमा हिरे यांच्या हस्ते करण्यात आला. या मोहिमेत पोलीस निरीक्षक मधुकर कड, नगरसेवक रत्नमाला राणे, श्याम बडोदे, अरुण पवार, रुची कुंभारकर, सुरेश खेताडे, दिनकर आढाव, रंजना बोराडे, प्रकाश बोराडे, सुप्रिया खोडे, पुष्पा आव्हाड, अनिल ताजनपुरे, सुवर्णा मटाले आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.विविध शासकीय कार्यालय परिसरात साफसफाईनाशिक शहरातील मुख्य रस्ते, तसेच विविध शासकीय कार्यालये येथे सकाळी ७.३० ते ११ या वेळेत स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या मोहिमेत सुमारे अडीच लाख चौरस मीटर क्षेत्रफळ आणि १११ कि.मी. लांबीचे रस्ते व परिसर स्वच्छ करण्यात आला. स्वच्छता मोहिमेत ५६ टन कचरा संकलित करून त्याची योग्य विल्हेवाट लावण्यात आली. यात २६१४ सदस्यांनी सहभाग घेतला. नाशिक शहराप्रमाणेच जिल्ह्यात त्र्यंबक, इगतपुरी, सिन्नर, सटाणा, येवला आदी नगरपालिका हद्दीत स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या अभियानासाठी महापालिका व नगरपालिका यांचे सहकार्य लाभले.

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान