Cleaning expedition at Manori | मानोरी येथे स्वच्छता मोहीम

मानोरी येथे जेसीबीच्या साहाय्याने स्वच्छता मोहीम राबविताना नंदाराम शेळके, पोपट शेळके, राजेंद्र शेळके आदी

मानोरी : कोरोनाच्या पाशर््वभूमीवर ग्रामपंचायतीच्या वतीने गावात जनजागृती करण्यात येत असून जंतुनाशक औषध फवारणीसह सार्वजनिक ठिकाण स्वच्छता अभियान राबविण्यात आले. गावात सार्वजनिक ठिकाणी असलेल्या जागेवर जेसीबीच्या साहाय्याने काटेरी झुडपे, गबळ, दगड - गोटे काढून स्वच्छता करण्यात आली. तसेच अंगणवाडी आण िजिल्हा परिषद प्राथमिक शाळेजवळील परिसर देखील स्वच्छ करून निर्जंतुकीकरण करण्यात आला. यावेळी सरपंच नंदाराम शेळके यांनी ग्रामस्थांना खबरदारी घेण्याबरोबरच सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचे आवाहन केले. याप्रसंगी ग्रामसेवक बाळासाहेब कुशारे, पोपट शेळके, शिपाई तुकाराम शेळके, राजेंद्र शेळके, शरद वाघ, जगन शेळके, रामकीसन साठे, पंकज खैरनार, योगेश साळवे आदी उपस्थित होते.

Web Title: Cleaning expedition at Manori

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.